Home Breaking News *वडगांव व्यापारी असोसिएशन ने* *जपली सामाजिक बांधिलकी*

*वडगांव व्यापारी असोसिएशन ने* *जपली सामाजिक बांधिलकी*

93
0

*वडगांव व्यापारी असोसिएशन ने* *जपली सामाजिक बांधिलकी*

*युवा मराठा न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात वडगांव व्यापारी असोसिएशनच्या वतीने १००० मास्कचे मोफत वाटप वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.मोहनलाल माळी व नुतन उपनगराध्यक्ष श्री.संतोष चव्हाण , सालपे आघाडीच्या नेत्या , विद्यमान नगरसेविका प्रविता सालपे , नगरसेविका सौ.सुनिता पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला पण अजुनही कोरोना संपलेला नाही .
व जगभरात कोरोनाची दुसरी लाट येते . त्यात वडगांवचा आठवडी बाजार हा मोठा व फार गर्दीचा असतो.
तसेच सनाची गर्दी . यामुळे आज सोमवारी वडगांव व्यापारी असोसिएशन पेठ वडगांव यांचे मार्फत सामाजिक बांधीलकी जपत पून्हा एकदा वडगांव शहरातील व्यापाऱ्यांचे व जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी जनजागृती व कोरोना पुन्हा पसरू नये यासाठी सोमवारच्या आठवडी बाजारासाठी बाहेरगांवाहून येणारे पथविक्रेते व्यापारी व स्थानिक पथविक्रेते व्यापारी यांना
“मोफत १००० मास्कचे”
वाटप करण्यात आले .
तसेच बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना मास्क , सॅनिटायझर , हँडग्लोज वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली . यावेळी व्यापारी असोसिएशनचे श्री.मनोज शहा , श्री.विपुल वडगांवे , श्री.संतोष लडगे , श्री.रोहीत माळी , श्री.महादेव हावळ , श्री.सतिश माळी ,श्री. प्रविण दुर्गुळे , श्री राजकुमार पाटील , श्री .राहुल काळे, इत्यादी सर्व मान्यवर व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व व्यापारी बंधू उपस्थित होते.

मोहन शिंदे 9850327474
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*वडगांव व्यापारीअसोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष , मुख्याधिकारी* *यांना निवेदन*
Next articleआमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून नायगाव ग्रामीण रुग्णालय दिली भेट स्वरूपात ॲम्बुलन्स..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here