• Home
  • 🛑 *दिवसभरात ४१० जण कोरोनामुक्त* 🛑

🛑 *दिवसभरात ४१० जण कोरोनामुक्त* 🛑

🛑 *दिवसभरात ४१० जण कोरोनामुक्त* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नव्याने आढळून येणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला दिलासा मिळत आहे. रविवारी 147 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 410 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील चोवीस तासात एकूण 32 जणांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी केवळ 1 हजार 27 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 147 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 845 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 6 हजार 424 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 639 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 356 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 283 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 4 हजार 141 वर पोहोचली आहे.

आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 282 झाली आहे. सध्या शहरात बाधित होणार्‍या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 93 टक्क्यांवर पोहाचला आहे. देशभरातील अन्य प्रमुख महानगरांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे….⭕

anews Banner

Leave A Comment