Home नाशिक सुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकारप्रदीप शिंदे यांचा सन्मान

सुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकारप्रदीप शिंदे यांचा सन्मान

187

आशाताई बच्छाव

IMG_20231219_191334.jpg

सुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकारप्रदीप शिंदे यांचा सन्मान

सुदर्शन बर्वे ( भगुर प्रतिनिधी) सुरक्षारक्षक आपले नियमित कामगिरी सांभाळत असताना समाजसेवी वृत्ती दाखवून इतरांना ही मदत करतात या बाबीचा विचार करत नाशिक येथील वडगांव पिंगळा येथे वास्तव्यास असलेले प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कोपरखैरणे (मुंबई) येथे सुरक्षारक्षक गुणगौरव सोहळा कार्यक्रमात सन्मानित करून प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह बहाल करण्यात आले यावेळी प्रदीप शिंदे सोबत राज्यातील इतर सुरक्षा रक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.
मुंबई येथील कोपरखैरणे येथील मनपा शाळा क्रमांक ३१ मध्ये सुरक्षारक्षक गौरव सोहळा- २०२३ चे आयोजन प्रवीण विटेकर सह आयोजक संतोष खामकर,दीपक चाळके यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रदीप शिंदे यांनी चित्रकला व लिफ्ट आर्ट मध्ये उत्कृष्ट कामगिरी दर्शविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके,सचिन गौरव नालींदे कामगार प्रतिनिधी चंद्रकांत बोबडे, हनुमंत सुरवसे,अशोक पाटील, लक्ष्मणराव भोसले,अजिंक्य भोसले , असलम इनामदार,अशोक कळसकर,मकरंद होमने आदी उपस्थित होते
सुरक्षा रक्षक कामावर कर्तव्यदक्षक असताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे म्हणजे कंपनीमधील मालमत्तेची चोरी करतेवेळी चोराला पकडणे कंपनीमधील जीविताचे प्रसंगावधान राखत रक्षण करणे व ज्या सुरक्षारक्षकांना समाजसेवा कला गुण कौशल्य विविध खेळांमध्ये पारितोषिक मिळाली असतील, अशा सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा या माध्यमातून केला जातो त्यात चित्रकार प्रदीप शिंदे यांचा सन्मान करण्यात आल्याने नाशिक येथे त्यांचे कौतुक होत आहे

Previous articleअवैध पणे गुटखा विक्री करणारा इसम मुंबई नाका पोलिस ठाण्यात जेरबंद करण्यात आला
Next articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दादासाहेब बनसोडे यांनी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.