• Home
  • 🛑वरवंटे,खलबते विकुन झाली पीएसआय🛑

🛑वरवंटे,खलबते विकुन झाली पीएसआय🛑

🛑वरवंटे,खलबते विकुन झाली पीएसआय🛑
✍️ भंडारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

भंडारा :⭕मोलमजूरी करणारा पती, पदरात दोन पोरं आणि म्हातारी आई, गावाबाहेरच्या पालावर राहणारं एक लहानसं कुटुंब. कधी खायला दोन वेळेच अन्नही नाही.

पण या कुटुंबाने देशासामोरच नव्हे तर जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. समोर आलेल्या संकटाना तोंड देत या मजुराच्या पत्नीने पदवी परीक्षा उत्तीर्ण तर केलीच पण तिने चक्क पोलिस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली आहे.

गावकुसाबाहेर पाल टाकून दगडी खल विकणाऱ्या पद्मशीला तिरपुडे यांची ही यशोगाथा.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत नुकत्याच झालेल्या उपनिरिक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा पार पडल. हा क्षण पद्म्शीला यांच्यासाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा- अभिमानाचा ठेवा ठरलाच तसाच तो अनेकांना प्रेरणा देणारा क्षण होता.

कारण याच दिवशी पद्मशीला तिरपुडे आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने नावलौकिक मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाचा मान मिळवला. राज्याच्या पोलीस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे २४ हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीची यंदाची १०८ वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली .

या तुकडीने सर्वाधिक १,५४४ फौजदार दिले आणि त्यात १२० महिला पोलीस अधिकारी आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment