• Home
  • संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया!!

संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया!!

संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया!! “आज २० आँक्टोबर २०२० आमच्या युवा मराठा वृतपत्र आणि आँनलाईन वेब न्युज चँनलचे मुख्य संपादक मा.श्री.राजेंद्र पाटील राऊत यांचा जन्मदिवस! संघर्षाच्या काटेरी वाटेवरील अविरतपणे ४९ वर्षाची वाटचाल आज त्यांच्या वाढदिवसानिमित ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.त्यानिमित हा त्यांच्या जीवन संघर्षाचा परिचय करुन देणारा लेख….”विष्णू अहिरे,विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र”१३ मे २०१३ हा दिवस मला आजही आठवतो कडक उन्हात जळगाव गाळणे रावळगाव रस्त्यावर त्यांची माझी भेट झाली! ऊन खुप असल्यामुळे ते झाडाचे सावलीत उभे होते .बाजुला सायकल लावलेली होती, मी सहजच चौकशी केली असता समजले की ते स्वतचे युवा मराठा वृत्तपत्र मालेगाव तालुक्यातील गावागावात सायकल ने जाऊन वाटत होते, त्या वरुन त्यांची परिस्थिती काय असेल याची जाणिव झाली. व हा माणुस नक्कीच पत्रकारिता या क्षेत्रात पुढे जाईल याची खात्री मला तेव्हाच झाली होती. आणि आज खरच ते भाकित खरे ठरले! व आज त्यांनी या क्षेत्रात भरपुर यश प्राप्त केले म्हणून त्यांचा खडतर, कष्टमय जिवनपट वाचका समोर मांडावा असे मला वाटले म्हणून हे लिहीत आहे . पत्रकारिता क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व राजेंद्र पाटील राऊत यांचा जीवन पट खुपच खडतर असा आहे राजेंद्र पाटील राऊत यांचा जन्म २०आँक्टोबर १९७१ रोजी श्रीरामपूर येथे झाला त्यांचे वडील शासकीय सेवेत नोकरीला होते राजेंद्र दिड वर्षाचा असताना त्यांचे वडीलांचे हार्टअँटकने निधन झाले.त्यानंतर आई लक्ष्मीबाई यानी मुलगा राजेंद्र व मुलगी याना नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळील कौळाणे (निं) या गावी आईच्या माहेरी व त्यांच्या आजोळी घेऊन आली.कौळाणे हे त्यांच्या मामांचे गाव.या गावात आयुष्य जगत असताना अनंत खस्ता राजेंद्र यानी खाल्ल्या व संघर्ष केला.लोकांच्या शेतात मोलमजुरीचे काम केलीत.लोकांच्या दारोदार पेपर वृतपत्र वाटप केलीत.शिक्षण कौळाणे व सोनज विद्यालयात पुर्ण केले.या संघर्षमय वाटचालीत लहानपणापासून त्यांची मेव्हणबहिण पुर्वाश्रमीची आशा शेवाळे व आताच्या युवा मराठा न्युज चँनल्च्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांनी पाटील यांना नेहमीच प्रोत्साहन दिले म्हणूनच त्यानी सकाळ, लोकमत गावकरी रामभुमी सारख्या वृतपत्रात जिल्हास्तरावर कौळाणे वार्ताहर म्हणून कामे केलीत.त्यानंतर राज्यस्तरावरील साप्ताहिक श्री,पोलिस विश्व, खरा गुन्हेगार,पोलिस नजर सत्यवार्ता, पोलिस वाणी,कोकण चौफेर आणि राष्ट्रीय पातळीवर अनुभवी आँखे न्युज चँनल व न्युजपेपर दिल्लीसाठी महाराष्ट्र प्रमुख म्हणून कामे केलीत त्यानंतर दिनांक २० आँक्टोबर २००३ रोजी स्वतःचे युवा मराठा हे साप्ताहिक वृतपत्र सुरु केले.मात्र नंतरच्या काळात धावपळीचे युग व आँनलाईनचा जमाना आल्याने वृतपत्रात थोडा बदल करुन युवा मराठा न्युज चँनल या नावाने आँनलाईन वृतवाहिनी सुरु केली,व वेब पोर्टलच्या माध्यमातून आधुनिक पध्दतीने बातम्या प्रसारीत करण्याचा बदल केला आज युवा मराठा न्युज पोर्टलचे महाराष्ट्रभरात एकूण ७०,००० हजार वाचक तयार झालेत.तर युवा मराठा न्युज साठी आज महाराष्ट्र भरात एकूण ५५ पत्रकार प्रतिनिधी मित्र जोडले गेले आहेत.हाच खरा तर संघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवास आहे २०१९ च्या जानेवारी महिन्यात मुंबईला क्राँईम इन्वीस्टिगेशन एक्सप्रेस या वृतपत्राचा समाजभुषण पुरस्कार सन्मानचिन्ह गौरवपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मानीत केले गेले.त्याशिवाय आज रोजी एडिटर्स अँन्ड जर्नालिस्ट वेल्फेयर असोशियन मुंबई या पत्रकारांच्या संघटनेवर महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.शिवाय पोलिस मित्र आणि इतरही सामाजिक संस्था संघटनावर कार्यरत आहे,त्याशिवाय ज्या गावात पत्रकारितेची सुरुवात केली त्या कौळाणे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने तत्कालीन सरपंच सौ,लताबाई बच्छाव तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार सन्मान करण्यात आला या सगळ्या प्रवासात बालपणाचा मित्र राजेंद्र शामराव वाघ राजेंद्र तुकाराम पवार हे नेहमीच पाठीशी उभे राहिलीत.तर श्रीमती आशाताई बच्छाव या एक खंबीर शक्तीनिशी सतत हिंमत देऊन धाडस दाखवित राहिल्यात.आणि हे करावेच लागेल असे प्रोत्साहन देत राहिल्या म्हणूनच अगदी दोन दिवसापुर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगंले तालुका युवा मराठा वृतपत्रांची आवृती सुरु झाली.लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून युवा मराठाच्या स्वतंत्र आवृतीचे प्रकाशन सुरु  करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. म्हणूनच तर जिद्द, हिंमत,आत्मविश्वासाच्या बळावर राजेंद्र पाटील राऊत यांच्यात शुन्यातून विश्व निर्माण करण्याचे धाडस आले हा रोमांचक जिवन काल नक्कीच इतरासाठी प्रेरणादायी ठरेल!! राजेंद्र पाटील राऊत यांच्या आजच्या वाढदिवसानिमित युवा मराठा परिवार महाराष्ट्रच्या वतीने लाखमोलाच्या अनमोल शुभेच्छा! व भावी वाटचालीस भरभरुन मनपुर्वक शुभकामना!!

anews Banner

Leave A Comment