Home जालना शेतकरी कन्येच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर

शेतकरी कन्येच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर

137

आशाताई बच्छाव

IMG_20240219_050557.jpg

शेतकरी कन्येच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर
घनसावंगी/ जालना ( दिलीप बोंडे ब्युरो चीफ)
घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील शेतकरी दशरथ घुंगासे यांच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी साखर कारखान्याच्या संचालिका वैशालीताई सतीश घाटगे यांनी  एक क्विंटल साखर घरपोच दिली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मान, सन्मान स्वाभिमान देणारा कारखाना म्हणून समृद्धीची ओळख आहे. शेतकऱ्यांबरोबरच समाजातील विविध घटकांसाठी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. याच सामाजिक उपक्रमाचा भाग असलेली एक क्विंटल घरपोच मोफत साखर ही योजना सभासद शेतकऱ्यांसाठी समृद्धी कारखाना राबवत आहे.  या योजनेअंतर्गत समृद्धी साखर कारखान्याचे  सभासद दशरथ घुंगासे यांच्या कन्येच्या विवाहासाठी कन्यादान म्हणून समृद्धी साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याच्या संचालिका वैशालीताई सतीश घाटगे यांनी एक क्विंटल साखर घरपोच दिली. यावेळी त्यांनी घुंगासे परिवारासोबत  हळदी समारंभास उपस्थितीत राहून वधूची भेट घेऊन वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी  सुभाष  जाधव,प्रवीण तौर,गजानन जाधव,ऋषी चिकणे, संतोष मुगे,शुभम काळे,किशोर राजूरकर, शिंदे उपस्थित होते

Previous articleमिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक मध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ चार तरुणाचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी.
Next articleसुरेश रेवणकर यांचे १५८ वे रक्तदान संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.