• Home
  • श्री महालक्ष्मी देवस्थान समिती अध्यक्षपदी मा. गुरूप्रसाद यादव

श्री महालक्ष्मी देवस्थान समिती अध्यक्षपदी मा. गुरूप्रसाद यादव

श्री महालक्ष्मी देवस्थान समिती अध्यक्षपदी मा. गुरूप्रसाद यादव

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील
श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन समिती पेठ वडगांव चे अध्यक्षपदी नगरसेवक गुरूप्रसाद दिलीपसिंह यादव यांची आज झालेल्या सभेमध्ये निवड करण्यात आली.
महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष स्व.दिलीपसिंह बळवंतराव यादव यांचे नुकतेच निधन झालेने अध्यक्ष पद रिक्त असलेने समितीने मिटिंग आयोजित केले होती .यावेळी समितीचे माजी.अध्यक्ष स्व.दिलीपसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सभेमधे एकमताने मा.गुरूप्रसाद दिलीपसिंह यादव नगरसेवक यांची निवड करण्यात आली तसेच त्यांना सभेच्या सर्व सभासदांनी पुढील वाटचालीस तसेच महालक्ष्मी मंदिर कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment