• Home
  • *कौळाणेत ग्रामपंचायतीचा कारनामा!* *असहमती म्हणजे काय रे भाऊ*

*कौळाणेत ग्रामपंचायतीचा कारनामा!* *असहमती म्हणजे काय रे भाऊ*

*कौळाणेत ग्रामपंचायतीचा कारनामा!*
*असहमती म्हणजे काय रे भाऊ*
*मालेगांव(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* फसवणूकीच्या नाना पध्दतीच्या नाना त-हा आपणांस नियमित बघावयास मिळतात.मात्र शासकीय फसवणूक सामन्यजनांची कशी होते,याचे उतम उदाहरण व नमूना म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निं) ग्रामपंचायतीचे द्यावे लागेल.हे गाव म्हणजे जगदविख्यात श्रीमंत राजे बडोदा नरेश सयाजीराव महाराज गायकवाड यांची जन्मभुमी.मात्र फसवणूकीच्या खेळात ग्रामपंचायतीचा कारनामा खुपच सरस ठरला आहे.सन २०१८मध्ये युवा मराठा न्युज चँनलच्या पत्रकार भवनसाठी दिलेली जागा २०+२० हि प्रोसिडिंग पुस्तकात ३०+३०कशी होते?आणि त्या जागेसाठीची सन २०१८ ते २०१९अशी ग्रामपंचायतीची करपावती देखील वसूल करुन बांधकाम परवानगी देण्यात येते.पत्रकार भवनच्या नावाने दिली गेलेली जागा सन २०१८ ते जुलै २०२० पर्यत कागदोपत्री युवा मराठा साठी असल्याचे दाखविते.आणि नेमकी तिच जागा माहे आँगस्ट २०२० मध्ये ग्रामपंचायतीवर प्रशासक कारकिर्द सुरु झाल्यावर तत्कालीन सरपंच कशी काय नामंजूर करु शकतात?त्यांना असहमत असल्याचे कारण प्रोसिडिंग बुकात लिहावे लागते.मात्र असहमत म्हणजे नेमके काय रे भाऊ!याचे मुद्देसुद कारण बुध्दीमान तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे व तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव या प्रोसिडिंग पुस्तकात मांडू शकले नाहीत,त्यामुळेच त्यांच्या बुध्दीची किव येते.त्याशिवाय तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी कायद्याचे तीनतेरा वाजवून शासकीय दप्तरात ग्रामसेवक संजीव घोंगडेच्या संगनमताने खाडाखोड करुन ग्रामपंचायत अधिनियम कायद्याचाच भंग केलेला आहे.त्याचा फैसला आता लवकरच युवा मराठा न्युजच्या वतीने होणाऱ्या उपोषण आंदोलनातून होणार आहे.
क्रमशः

anews Banner

Leave A Comment