• Home
  • *सकल मराठा समाजाच्या वतीने* *इचलकरंजीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण*

*सकल मराठा समाजाच्या वतीने* *इचलकरंजीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण*

*सकल मराठा समाजाच्या वतीने* *इचलकरंजीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील
इचलकरंजी शहरात सकल मराठा समाज्याच्या वतीने छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांतआँफिस जवळ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील विध्यार्थींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे .
आज इचलकरंजी मधे सर्व मराठा बांधव एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांचा आशिर्वाद घेऊन राज्य व केंद्र सरकार विरोधात घोषणा देत मोर्चा प्रांतआँफिजवळ उपोषणाच्या ठिकाणी पोहचला.
या ठीकाणी प्रथमता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून उपोषणाला सुरवात केली.
यावेळी राज्य सरकार मराठा समाजाकडे आरक्षणाबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
तसेच इचलकरंजी व परिसरातील सकल मराठा समाजाचे मराठा बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होता.

anews Banner

Leave A Comment