Home उतर महाराष्ट्र जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त पशु संवर्धन विभाग साक्री तालुका आयोजित रेबीज प्रतिबंधक लसीकरण...

जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त पशु संवर्धन विभाग साक्री तालुका आयोजित रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न

34
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220502-WA0062.jpg

जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त पशु संवर्धन विभाग साक्री तालुका आयोजित रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न

वासखेडी – साक्री तालुका पशु संवर्धन विभाग आयोजित साक्री येथे जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर शिबीर आयोजीत करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उदघाटन गटविकास अधिकारी श्री,जे,टी,सुर्यवंशी, तसेच तहसिलदार श्री,प्रविण चव्हाणके यांच्या शुभ हस्ते करण्यांत आले.
साक्री येथील सहा,आयुक्त डॉ, योगेश गावित, यांनी पाळीव प्राण्यांची काळजी व त्यातील रेबीज आजारावरील प्रदीर्घ माहीती व त्यांच्या मनावर येणाऱ्या विविध परिणामांची माहीती देवुन सर्व श्वान प्रेमिंना आपल्या तालुक्याचे लसीकरण पशुसंवर्धन चिकीत्सालया मार्फत रेबीज लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले,
जागतिक पशु वैध्यक दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे प्राण्यांचा आरोग्य सेवेबद्दल जागरुकता पसरविणे ,प्राण्यांवरील क्रुरता रोखणे,हा असल्याणे आजचा दिवस मुक्या प्राण्यांवर निसर्ग प्रेम करून ,विविध संसर्गजन्य आजारांशी लढा देत प्राण्यांना,योग्य उपचार करणाऱ्या सर्व पशु वैदयकांना समर्पित करण्यांत आला,
या शिबिरा प्रसंगी एकुण ६९ श्वानांना श्वान दंश प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यांत आले, प्रसंगी डॉ, बाबा देवरे यांनी पशु पालकांना उन्हाळ्यात श्वानांची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन केले,
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ, मंगेश हेमाडे यांनी केले,तर सुत्रसंचलन डॉ, दिलीप लोखंडे यांनी केले,
कार्यक्रम यशस्वी ते साठी डॉ, यशवंत बहीरम,डॉ, चंद्रकांत आव्हाड,डॉ, हेमंत महाले,डॉ, संदीप कोकणी,डॉ, ऋषभ दाभोराव,डॉ, मंजुषा ढगे,डॉ, वर्षा ठाकरे,डॉ, संगिता बेले,डॉ, मधुकर कोळी,डॉ, शामराव कवडे,डॉ, रविन्द्र चौधरी,डॉ, विनोद अहीरे,डॉ, अमित नजन ,परीचर भिमा वाघमोडे, भामरे दादा,देवा सोनवणे,सागर हिरे,विजय नेरकर आदी,मेहनत घेतली,
प्रसंगी श्री,टीकाराम भिका भोये(परीचय ता,लघु पशु) सर्व चिकीत्सालय येथे शासनाची ४१वर्षाची प्रदीर्घकाळ सेवा करून सेवा प्रसंगी श्री,तहसिलदार व मा,गटविकास अधिकारी, यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देवुन गौरविण्यात आले.

Previous articleचिमुकल्यांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेश सोहळा,वासखेडी च्या अंगणवाडीत फुलला
Next articleमं.गा.विद्यालयाच्या प्रांगणा १में महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here