Home उतर महाराष्ट्र चिमुकल्यांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेश सोहळा,वासखेडी च्या अंगणवाडीत फुलला

चिमुकल्यांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेश सोहळा,वासखेडी च्या अंगणवाडीत फुलला

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220502-WA0051.jpg

चिमुकल्यांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेश सोहळा,वासखेडी च्या अंगणवाडीत फुलला

वासखेडी -येथील अंगणवाडीत आज रोजी पसन्न वातावरणात चिमुकल्यांनी फुलवली आपली अंगणवाडी आणि केला प्रवेश सोहळा,त्याप्रसंगी अंगणवाडी, सेविका,मदतनीसांनी औक्षण,आणि फुलांचा वर्षाव करून अगदी आनंदमय वातावरणात केले स्वागत, जसे की,”लहान मुलं म्हणजे देवा घरची फुले”या म्हणी प्रमाणे आज रोजी चिमुकल्यांनी केला शिक्षण रूपी मंदीरात प्रवेश,चेहऱ्यावरून अगदी हसमुख प्रसन्नता दिसुन येत होती,अंगणवाडी तील खेळणी बघुन,खेळ खेळुन तर जसा बाळ गोपाळांचा जणु मेळावाच सुरू होता,असे दिसत होते,तसेच या वातावरणाने चिमुकल्यांनी मणमुराद आनंद लुटत,एक फुलरूपी आनंद त्यांच्या मनात म्हावत नसावा असे चित्र निर्माण केले,डोक्यावर वाढदिवसाची टोपी परीधान करून आज रोजी वाढदिवस आणि प्रवेश करून आपला आनंद द्विगुणीत केला,अंगणवाडी ची सजावट बघता चिमुकल्यांनी फुलवली आपली अंगणवाडी ,त्यांच्या या अगमणाने सेविका, मदतनीस, अगदी भारावुन गेले,या कार्यक्रमा प्रसंगी गावकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव देखील केला, कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,सौ,रूपाली भानुदास वाघ,(सेविका) सौ,सुनंदा साहेबराव बच्छाव, (सेविका) सौ,शोभाबाई सुनिल ठाकरे,(सेविका) सौ,लताबाई प्रभाकर दहीते, (मदतनीस) सौ,चित्राबाई शांताराम माळचे(मदतनीस) सौ,प्रमिलाबाई शांताराम बाविस्कर(मदतनीस) तसेच वर्सुस येथील अंगणवाडी सेविका सौ,अनिता शिवाजी काकुळते,व मदतनीस सौ,उषाबाई निंबा माळचे,तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय बेडसे,वर्सुसचे रावसाहेब सोनवणे,तसेच ग्रां.पं.कर्मचारी,राजेश खारकर,धनराज सूर्यवंशी यांनी मेहनत घेतली,
चिमुकल्यांचे कौतुकास्पद आभार, पत्रकार तथा रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ जाधव यांनी केले तसेच कार्यक्रमाचा समारोप देखील केला.

Previous articleसंपादकिय अग्रलेख… “आग लावू तमाशा पाहू..! गावोगांवी नारदमुनीची औलाद वाढत आहे !
Next articleजागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त पशु संवर्धन विभाग साक्री तालुका आयोजित रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here