• Home
  • *राष्ट्रपिता म.गांधी,लालबहादूर शास्त्री जयंती व संस्थेचा वर्धापन दिन टी. के. आर. एच. विद्यालयात साजरा*

*राष्ट्रपिता म.गांधी,लालबहादूर शास्त्री जयंती व संस्थेचा वर्धापन दिन टी. के. आर. एच. विद्यालयात साजरा*

*राष्ट्रपिता म.गांधी,लालबहादूर शास्त्री जयंती व संस्थेचा वर्धापन दिन टी. के. आर. एच. विद्यालयात साजरा* निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
टी.के.आर.एच.विद्यालय, निमगाव. ता.मालेगाव येथे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा ६८ वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.आर.जे.निकम यांच्या हस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कै. तात्यासाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात आले. तद्नंतर राष्ट्रपिता म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व संस्थेचा ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. निकम यांनी संस्थेचे एकुणच सामाजिक व शैक्षणिक योगदान तसेच अहिंसेतुन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान या घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी बोधपर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.बी. बी.अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.एम. एन.शिरोळे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.आर. के. भामरे ,पर्यवेक्षक श्री. जी.ए.शेवाळे आणि सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

anews Banner

Leave A Comment