• Home
  • 🛑 ‘या’ जिल्ह्यात मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा 🛑

🛑 ‘या’ जिल्ह्यात मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा 🛑

🛑 ‘या’ जिल्ह्यात मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सांगली, 25 सप्टेंबर : ⭕ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपकडून सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. हेच औचित्य साधून युवक कॉँग्रेसकडून ‘बेरोजगार दिन आंदोलन’ करण्यात आले. सांगलीत गुरुवारी युवक कॉँग्रेसने धरणे आंदोलन करून वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी लॉकडाउऊनमध्ये १२ ते १३ कोटी लोकांचा रोजगार घालवल्याचा आरोपही केला आहे.

भाजपच्या वतीने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सांगली जिल्हा भाजपच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. युवक कॉँग्रेसने मात्र अनोख्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाची भेट दिली. युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनसमोर ठिय्या मारून बेरोजगार दिन आंदोलन केले. वाढलेल्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच लॉकडाउनमध्ये देशात १२ ते १३ कोटी लोकांचा रोजगार गेल्याचा आरोपही युवक कॉँग्रेसने केला.

यावेळी बोलताना युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण म्हणाले, ‘वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशाचा जीडीपी दर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत खाली आला. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना थेट आर्थिक पॅकेजची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी, लघु व मध्यम उद्योग यापैकी कोणत्याही घटकाला मदत मिळाली नाही. केंद्र सरकार राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात धन्यता मानत आहे. अशा परिस्थितीत बिगर भाजपशासित राज्यांचा कारभार चालवणे मुश्कील झाले आहे. सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा अजेंडा नरेंद्र मोदी राबवत आहेत. रोजगार नसल्याने तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची जबाबदारी ढकलून चालणार नाही.’ यावेळी शहर अध्यक्ष सौरभ पाटील, सानी धोत्रे, अरविंद पाटील, योगेश राणे, सोहेल बलबंड, मयूर पेडणेकर, आशिष चौधरी, शुभम बनसोडे, आदी उपस्थित होते.⭕

anews Banner

Leave A Comment