• Home
  • 🚫⭕आमदारांच्या नावे धावणाऱ्या कारला पोलिसांचा ब्रेक⭕🚫

🚫⭕आमदारांच्या नावे धावणाऱ्या कारला पोलिसांचा ब्रेक⭕🚫

पुणे १६ सप्टेंबर⭕🚗 ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)🚗⭕
‌‌
🚫⭕आमदारांच्या नावे धावणाऱ्या कारला पोलिसांचा ब्रेक⭕🚫
वाहन चालकाला साडेपाच हजार रुपयांचा दंड.
येरवडा. कार वर आमदाराच्या नावाची नेम प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनचालकास महागात पडले त्या चालकाकडून वाहतूक पोलिसांनी साडेपाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कार्यवाही होऊ नये म्हणून संबंधिताने आमदारा मार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्य दबावाला बळी न पडता येरवडा वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक.
एस. एस. पडसळकर यांनी कार्यवाही केली.

कोरोना पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालकावर कार्यवाही करण्यात येत आहे.
जेल रोड वर कॉमर झोन समोरून कार भरधाव जात असल्याचे वाहतूक पोलिसांना दिसले.
त्या वाहनचालकाला थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.
तरी पोलिसांना न जुमानता तो वाहन चालक भरधाव पणे पुढे गेला.
इतर पोलिसांच्या मदतीने मेंटल कॉर्नरवर ती गाडी अडविण्यात आली.
वाहन चालक (महेश कैलास साळुंके राहणार भोसरी) हे आपली विना नंबर प्लेट कार
(एम एच ०३ .१९८२) ही गाडी भरधाव चालवत असताना वाहतूक पोलिसांनी गाडी अडवली गाडीच्या मागे काच वरती आमदार महेश दादा लांडगे लिहिले होते.
शिवाय गाडीवर मागे नंबर टाकला नव्हता.
नंबर ऐवजी एम डी असे लिहून आमदारांचा फोटो लावण्यात आला होता.
गाडीच्या काचा देखील काळ्या होत्या.
पोलिसांनी या वाहनावर इन्शुरन्स २३००रूपये.
बेदरकारपणे वाहन चालवणे १००० रुपये.
काळी काच २०० रुपये.
नंबर प्लेट नसणे २००रुपये.
लायसन जवळ न बाळगणे २००रुपये.
व वाहनावर असलेला पूर्वीचा दंड असा एकूण साडेपाच हजार रुपये चा दंड साळुंके यांच्या कडून वसूल केला

anews Banner

Leave A Comment