पुरोगामी पत्रकार संघाची बागलाण तालुका कार्यकारणी जाहीर
(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क )
सटाणा दि.०७: पत्रकारांनी संघटीत होवुन एकत्रीत लढा उभारून न्याय दिला पाहिजे असे उद्गार पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय दोंदे यांनी केले. ते बागलाण तालुक्यातील पुरोगामी पत्रकार संघाच्या सटाणा येथिल कार्यक्रमात बोलत होते.
पुरोगामी पत्रकार संघाची आज (दि.०६) रोजी जिल्हाध्यक्ष संजय दोंधे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बागलाण तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत बिरारी, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष वैभव नंदाळे, तुलसीदास सावकार, कार्यध्यक्ष हिरालाल बाविस्कर, तालूका सरचिटणीस प्रशांत कोठावदे, तुषार रौदल, चिटणीस प्रमोद कुवर, अतुल सूर्यवंशी, खजिनदार श्याम कापुरे, सह खजिनदार राजेंद्र सावकार आदींची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र उपाध्यक्ष चितळकर, प्रहारचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, संघटनेचे कार्यकरणी सदस्य प्रवीण जोशी, संदीप अवधूत, अमोल भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष रफिक सय्यद, रवींद्र मोरे, रामनाथ पन्हल, आदींनी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केली व काही अडचणी असतील तर त्या जाणुन घेतल्या.
कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.