*खाकी वर्दीतील देव माणूस*
*कर्तव्यदक्ष अधिकारी.*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील वडगांव पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलिस निरीक्षक मा.प्रदिप काळे सो. कोरोना महामारीच्या संकटात वडगांव नगरीची सेवा करत असताना ,चोख बंदोबस्त बजावताना स्वतः कोरोना बाधित होऊन स्वतःच्या वृद्ध आईना ही कोरोना संसर्ग झाला .
दोघेही सि.सि.सि.केद्रामधे भरती झाले.सकारात्मकता आणि दृढनिश्चयाने आणि श्री महालक्ष्मी च्या आशिर्वादाने व वडगांव नागरीकांचि समर्थ साथीने ते दोन आठवढ्यातच कोरोनावर मात करून परात पुन्हा जनतेचा सेवेसाठी पोलिस सेवेत दाखल झाले.
स्वतः कोरोनावर मात करून ते पुर्ण बरे होऊन त्यांनी आज एक महत्वपुर्ण निर्णय घेतला तो म्हणजे त्यांनी स्वतः सि.पी.आर. (शसकिय रूग्णालय कोल्हापूर ) येथे जाऊन दोन रूग्णांना पुरेल एवढा प्लाजमा दान सुद्धा करून आले आहेत .
उद्या होणाऱ्या अनंतचतुर्दशी बंदोबस्ता मधे देखिल ते वडगांव शहरात चोख बंदोबस्तासाठी नागरीकांच्या सेवेला हजर राहतील.
आज खऱ्या अर्थाने खाकी वर्दीतील देवमाणूस पहायला मिळाला .
जिल्हा पोलीस प्रमुख श्री अभिनव देशमुख यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप काळेंचे मानले आभार पोलिस खात्यासह सर्वत्र काळे साहेबांच कौतुक होत आहे .
वडगांव नगरीच्या गणेशभक्तांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला युवा मराठा न्युजचा सलाम.