• Home
  • 🛑 रेशन दुकानदार मोफत धान्य देत नसल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर तक्रार करा 🛑

🛑 रेशन दुकानदार मोफत धान्य देत नसल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर तक्रार करा 🛑

🛑 रेशन दुकानदार मोफत धान्य देत नसल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर तक्रार करा 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 ऑगस्ट : ⭕ केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्डवरील प्रति व्यक्तीस 5 किलो अन्न धान्य वितरण केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत गरिबांना हे मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी गरिबांची स्वस्त धान्य दुकानदारांकडून पिळवणूक होत आहे. कार्डधारकांना धान्य मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो.

स्वस्त धान्य दुकानधारकांकडून रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. या काळ्या बाजारातून धान्याची खरेदी-विक्री होत असल्याने गरिबांना कमी धान्य दिले जाते किंवा दिलेच जात नाही, असे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे, कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येत नसेल तर संबधित जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्यात यावी.

तसेच, राज्य पुरवठा आणि नियंत्रण कक्षाकडेही धान्य दुकानदाराची तक्रार करता येऊ शकते. त्यासाठी, सरकारने टोल फ्री नंबर जारी केला आहे. 1800-180-2087, 1800-212-5512 आणि 1967 या नंबरवर फोन करुन तुम्ही संबंधित दुकानदाराची तक्रार देऊ शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण योजनेंतर्गत लॉकडाऊन काळात ही मोफत धान्य योजना सुरु केली आहे. ज्या गरिब कुटुंबीयांकडे रेशनकार्ड नाही, अशांनाही रेशनचे धान्य देण्याचे सरकारने बजावले आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून नोव्हेंबर 2020 पर्यंत हे मोफत धान्य देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अद्यापही गरिबांना धान्य मिळत नसल्याचे समोर येत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment