• Home
  • 🛑 *मध्यवर्ती पेठांमध्ये एकाच रात्रीत 5 दुकाने फोडले** 🛑

🛑 *मध्यवर्ती पेठांमध्ये एकाच रात्रीत 5 दुकाने फोडले** 🛑

🛑 *मध्यवर्ती पेठांमध्ये एकाच रात्रीत 5 दुकाने फोडले** 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕– शहरातील मध्यवर्ती भागातील भवानी पेठ आणि रविवार पेठेतील कुलुपबंद दुकानाचे शटर उचकवटून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

एका रात्रीमध्ये दुकाने फोडल्याने पेठांमधील व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी अमित ओसवाल (33 , रा. मार्केटयार्ड ) यांच्या मालकीचे भवानी पेठेत श्रीराम टेक्‍सटाईल नावाचे दुकान आहे.

शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर चोरट्यानी शटर उचकवटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथुन जवळ असलेल्या जयंत गुणराणी यांचे चिमनालाल गोविंददास नावाचे खाद्यतेल आणि वनस्पति तूप विक्री दुकानाचे उचकवटून आतमधील रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक एन बी. सावंत हे पुढील तपास करीत आहेत.

त्यानंतर त्याच रात्री रविवार पेठेतील तीन दुकाने चोरट्यानी फोडले. या प्रकरणी पृथ्वीराज बारड (46 , रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे रविवार पेठेत राज हॅंडलूम आणि होजीअरी नावाचे दुकान आहे.

दुकान बंद असताना चोरट्यानी दुकानाचे शटर उचकवटले. तसेच जवळचे अथर्व गारमेंट्‌स, राजल ट्रेडिंग कंपनी ही कुलूपबंद दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न केला.

पुढील तपास उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील या करीत आहेत.भवानी पेठ आणि राविवार पेठत दुकाने फोडून गल्ल्यातील रक्कम चोरून नेण्याचा चोरट्यांचा इरादा होता. मात्र, त्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. यामुळे दुकानाचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी कोरेगाव पार्क, औंध, खडकी, येरवडा भागात दुकाने, मेडिकल शॉप आदी फोडून रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्य असा ऐवज चोरट्यानी लंपास केला होता. तपास करून पुणे पोलीसांनी पिंपरी चिंचवड भागातील एका सराईत गुन्हेगारास दोघांना अटक केली होती…..⭕

anews Banner

Leave A Comment