हातावर पोट असणाऱ्या गणेश मुर्तीकारांचा महा.शासनाने अर्थिक सहकार्य करावे ; किरण सेठ मामीडवार –
नांदेड, दि,५ ; राजेश एन भांगे
जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे गणेश मंडळांना ४ फुटाच्या वर श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करता येणार नाही. मूर्तिकारांनी तर आधीच भरपूर मूर्ती तयार करून ठेवली असुन त्यांच्या त्या मूर्ती विक्री त्यांना करता येणार नाहीत. या वर्षी त्या मूर्तिकारांना सहकार्य म्हणून शक्यतोवर घरगुती मूर्ती व मंडळाच्या मूर्ती भाव न करता मूर्तींची खरेदी करावी जेणे करून त्यांच्या नुकसानीची थोडीफार भरपाई होईल. महाराष्ट्र शासनाने हातावर पोट असणाऱ्या मुर्तीकार बांधवांचा विचार करून त्यांना आर्थिक सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. मा.खासदारसाहेब,आमदारसाहेब,लोकप्रतिनिधी यांनी या समस्येची गांभिर्याने दखल घेऊन मुर्तीकार बांधवांच्या वर्षभर मेहनत करून घडविलेल्या मूर्ती बद्दल नक्कीच अनुदान उपलब्ध करून द्यावे जेणे करून या कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार नाही अशी ही कळकळीची नम्र विनंती किरणसेठ मामीडवार, सोशल मीडिया महामित्र, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य, यांनी केले आहे.