Home Breaking News *’अहिल्याबाई होळकर आवास योजना’ धनगर समाजाला घर बांधण्यासाठी नवीन योजना** ✍️(▪️राहुल मोरे...

*’अहिल्याबाई होळकर आवास योजना’ धनगर समाजाला घर बांधण्यासाठी नवीन योजना** ✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

447
0

*’अहिल्याबाई होळकर आवास योजना’ धनगर समाजाला घर बांधण्यासाठी नवीन योजना**
✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना’ या योजनेचे नामकरण आता ‘अहिल्यादेवी होळकर आवास योजना’ असे करण्यात आले आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
श्री.वडेट्टीवार यावेळी म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष, दानशूर, कर्तृत्ववान, सुधारणावादी, कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्या युद्धकुशल, श्रेष्ठ मुत्सद्दी न्यायप्रिय शासक होत्या. त्यांनी अनेक घाट, विहिरी, मंदिरे, धर्मशाळा, पाणपोई यांची बांधणी केली तसेच अन्नछत्राची उभारणी केली. सर्वधर्मसमभावाची जपणूक करत स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न केला.त्यांनी वस्त्रोद्योग, कुटिरोद्योगास चालना दिली. असे अनेक महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या आणि सर्वच राज्यकर्त्यांच्या प्रेरणास्थान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहिताच्या, न्यायाच्या शिकवणुकीला समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही श्री.वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Previous articleयुवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 10 जुलै भोसरीत पगार न दिल्याने सुपरवायझरने केली गळफास घेऊन आत्महत्या दरम्यान ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साइटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास
Next article**विकास दुबेचा एन्काऊंटर: कानपुर पोलिसांची हत्या करनारा गँगस्टर ठार**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here