Home Breaking News कोरोना योद्धे- इनामदार कोरोनावर मात करून नागरिकांच्या सेवेसाठी रूजू ✍️ पुणे...

कोरोना योद्धे- इनामदार कोरोनावर मात करून नागरिकांच्या सेवेसाठी रूजू ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

140
0

🛑 कोरोना योद्धे- इनामदार कोरोनावर मात करून नागरिकांच्या सेवेसाठी रूजू 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

गोखलेनगर (पुणे):⭕ कोरोनावर मात करून आरोग्य अधिकारी पुन्हा नागरिकांच्या सेवेत रूजू झाले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात सेवेत असणारे आरोग्य अधिकारी आय. एस. इनामदार हे कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू झाल्यापासून पाटील इस्टेट, राजीव गांधी नगर, कामगार पुतळा, गोखलेनगर, वडारवाडी, पांडवनगर, जनवाडी हेल्थ कॅम्प या परिसरात जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी कोरोना रुग्णांना बाहेर काढणे, दुसरीकडे हलवणे, तपासणी करणे असे अडीच महिने रुग्णसेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

यशस्वी उपचारानंतर कोरोनावर मात करत ते पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी मंगळवारी ( ता.
२३) पुन्हा हजर झाले. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे, सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, नगरसेवक आदित्य माळवे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांचा वर्षाव करून इनामदार यांचे कार्यालयात स्वागत केले.

“पुणे महापालिकेने नेमून दिलेल्या दाखवन्यात प्रथम जावं. कोरोना झाला म्हणून कोणी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझर वापरावं, नियमित हात धुणे यासह शासनाने दिलेल्या नियामांचे पालन करावे. समाजात भिती निर्माण झाली आहे. त्याला आपण हद्दपार करू शकतो. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर (ता. ३०) मे रोजी दाखवण्यात अॅडमिट झालो होतो. पाच दिवसाचा कोर्स होता तो पूर्ण केल्यानंतर, रक्ततपासणी केली व (ता. ८) जून रोजी मला कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले. शासनाच्या नियमाप्रमाणे १४ दिवस होम क्वारंटाइन झाल्यावर बुधवार (ता.२३) पासून सेवेत रूजू झालो”.
– इमामुद्दीन इनामदार , मुख्य आरोग्य निरीक्षक, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here