Home आंतरराष्ट्रीय व्हॉट्सएँपला स्वदेशी पर्याय आला !

व्हॉट्सएँपला स्वदेशी पर्याय आला !

103
0

🛑 आला… आला! 🛑
⭕” भारत मँसेंजर “⭕
व्हॉट्सएँपला स्वदेशी पर्याय आला !
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत उदयाला आलेल्या व्हॉट्‌सऍपने जगभरात धमाल उडवून दिली. फार अल्प काळात या ऍपने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हक्‍काचे स्थान निर्माण केले. व्हॉट्‌सऍपने केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगातील लोकांच्या जीवनशैलीतही मोलाचे बदल घडविले. मात्र, आता काळ स्वदेशीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ग्रुपवर चर्चा रंगते आहे ती भारतीय बनावटीच्या भारत मॅसेंजरची.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जगाने बघता बघता चीनच्या वस्तूंना बॉयकॉट करणे प्रारंभ केले आहे. याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मोबाईलमधील चीन बनावटीचे ऍपदेखील अनइन्स्टॉल करणे प्रारंभ केले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो टिकटॉकला.

अनेकांनी टिकटॉक ऍपला बाहेरचा रस्ता दाखविला असून, आता व्हॉट्‌सऍप मॅसेंजरलाही पर्याय उपलब्ध झाला असल्याने भारतीयांनी भारत मॅसेंजरला पसंती दिलेली आहे.

सोनम वांगचूक यांनी नुकतेच भारतीयांना चिनी प्रॉडक्‍स बॉयकॉट करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक युद्ध सीमेवर लढता येते असे समजू नका, तर देशातील सामान्य व्यक्‍तीलाही ते लढायचे आहे, असे वांगचूक म्हणाले होते. व्हॉट्‌सऍपचा जन्म दक्षिण अमेरिकेत झाला असला तरी व्हॉट्‌सऍपच्या धर्तीवर भारत मॅसेंजरचा चाहतावर्गदेखील झपाट्याने वाढतो आहे. एका समुदायाने तर एक जूनला सर्वांनी भारत मॅसेंजर डाउनलोड करून घ्या, असेदेखील आवाहन केले आहे.

Previous articleसर्वसामान्यांच्या ‘लालपरी’चा आज वाढदिवस, महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटीची रंजक कहाणी
Next articleभाई गुरूनाथराव कुरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथे डाॕ.शितल दत्तात्राय कुरूडे यांनी केले आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॕथिक गोळ्यांचे वाटप*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here