Home भंडारा भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड- कु. संजना संजीव भांबोरे

भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड- कु. संजना संजीव भांबोरे

159
0

आशाताई बच्छाव

IMG_20231104_155033.jpg

भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड- कु. संजना संजीव भांबोरे

‘भ्रष्टाचाराचे धनवान पुजारी भीक मागतो होऊन भिकारी ,कधी प्रेमाने तर बळजबरी ,लाच घेतो ते नाना प्रकारे ,

काही वर्षांपूर्वी आपला देश हा भ्रष्टाचार मुक्त होता. भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला समाजामध्ये अतिशय कमी दर्जाचे लेखले जायचे. पण दिवसेंदिवस आपल्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होऊन भ्रष्टाचाराची लागवण एखाद्या रोगासारखी पसरलेली आहे. उलट भ्रष्टाचार हाच जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे असे काहींना वाटत आहे. समाजामध्ये काही लोकांच्या चुकीच्या वागण्यावरून याचे परिणाम सर्वत्र भोगावे लागत आहे. आज मोठमोठ्या शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यात सुद्धा भ्रष्टाचाराची लागवड आपल्याला दिसून येते. गावातील कामकाजावर योग्य लक्ष दिले नाहीत तर त्या कामात सुद्धा भ्रष्टाचार दिसून येतो .सर्वप्रथम या भ्रष्टाचाराची लागवण सरकारी कर्मचाऱ्याकडूनच झाली असे म्हटले तरी चुकीचे नाही. कोणतेही काम तेथील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल तर त्यांचे खिसे भरावे लागतात .निस्वार्थपणे काम करणे हा जणू अंगाला काटा रुतल्या सारखा यांना वाटतो .आज प्रत्येक क्षेत्रात क्षेत्र लहान असो किंवा मोठे क्षेत्र असो राजकीय ,शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य इत्यादी क्षेत्रात भ्रष्टाचाराचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात दिसून येते .ज्याप्रमाणे टोपलीतील एखादा आंबा नाशका झाला की सगळे आंबे खराब होतात त्याचप्रमाणे भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली एक कीड सर्वत्र पसरत आहे .आज आपण पाहतो की ,सर्व सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे .गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा आणखी श्रीमंत होतो असे आपल्याला दिसते .गरीबाच्या मुलाने उच्च शिक्षण घेऊ नये त्याने कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू नये हा त्यामागचा उद्देश आहे. सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना वाव दिला जातो आणि शिक्षणाला रक्कम घेऊन देऊन दिले जाते .मोफत शिक्षण मिळणे हा माणसाचा अधिकार असतो आणि हाच अधिकार माणसांकडून खाजगीकरण करून हिसकावून घेतला जातो. जो तो हा फक्त पैशाच्या मागे लागताना आपल्याला दिसतो .सामान्य जनतेचा कोणी विचार करत नाही. त्यांचा आवाज एखाद्या बंद कमरेत दाबला जातो. आज दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेचे महत्त्व वाढत आहे. प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावे म्हणून दिवस-रात्र मेहनत करत असतो पण काही भ्रष्टाचारी लोकांमुळे काही विद्यार्थी सेटिंग लावून नोकरीवर लागले आहेत .आणि मेहनत करणारा मागे पडलाय आहे. आधी डॉक्टराला परमेश्वराचे स्थान दिले जायचे आता हेच डॉक्टर भ्रष्टाचाराच्या मानसिकतेमुळे सामान्य जनतेचे शिकारी झाले आहेत .आधी पैसा मग त्या व्यक्तीला जीवनदान मिळतो. पैशाच्या मोल आज माणसाच्या जीवनापेक्षाही मोठा झाला आहे .खरं तर आपल्या परिसरामध्ये जेव्हा मी असे बघते तेव्हा असे वाटते की, खरंच एखादा माणसाच्या जीवनापेक्षा पैसा हा मोठा असू शकतो काय ?किंवा त्याच्या आनंदापेक्षा भ्रष्टाचार हा मोठा असू शकतो काय ?असे विविध प्रश्न जेव्हा पडतात तेव्हा अंगावर काटा रुतल्या सारखा वाटतो. प्रत्येक ठिकाणी जर भ्रष्टाचाराला वाव मिळाला तर गरिबाच्या मुलाने आपले जीवन जगण्याचे मार्ग काढावा तरी कुठून? आपल्या एका मतदानावर सरकार निवडून येते आणि सरकार जर सामान्य जनतेच्या जीवनाशी खेळू लागेल तर जनतेने अवलंबून तरी कुणावर रहावे ! भ्रष्टाचार थांबला नाही तर मरण्याची वेळ ही प्रत्येक गोर गरिबाच्या कुटुंबावरील येईल .शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तर जीवन जगणे हे सामान्य जनतेचा अधिकार आहे. आणि जीवन जगण्यासाठी सरकारकडून योग्य ती सुविधा मिळणे हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. भ्रष्टाचाराला चालणा न देता माणसाने माणुसकीच्या वाटेवर चालणे हेच आपले कर्तव्य आहे .जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला योग्य ती शिक्षा देणे हे येथील न्यायव्यवस्थेचे काम आहे. भ्रष्टाचारी वृद्धीच्या लोकांवर दंड आकारणे जन्मठेप देणे हा एक मात्र उपाय आहे .शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा व भ्रष्टाचारांना देशातून हाक लावून लावा आज जर सुरुवात झाली नाही तर पुढील पाच वर्षात महागाई वाढेल. गरिबाचा एकही मुलगा उच्च पदावर जाणार नाही आणि पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही .देशातून भ्रष्टाचार संपवून टाकणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे प्रत्येकाने जर भ्रष्टाचार थांबविण्याचा प्रयत्न केला तर हा देश पुन्हा एकदा भ्रष्टाचार मुक्त बनू शकतो व प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो. आचरण सुधारा भ्रष्टाचाराला विरोध करा.

,थांबवा भ्रष्टाचार नका होऊ त्यात सहभागी हाच सल्ला आहे सर्वांचा बाकी जबाबदारी तुमची,

कु. इंजिनीयर संजना संजीव भांबोरे मु .पो. पहेला तालुका जिल्हा भंडारा

Previous articleयुद्ध नको ,बुद्ध हवा :-गायक तनुजा नागदेवे
Next articleराधिका फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम- ३५ नवदुर्गांचा केला सन्मान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here