Home नाशिक राधिका फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम- ३५ नवदुर्गांचा केला सन्मान

राधिका फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम- ३५ नवदुर्गांचा केला सन्मान

99
0

आशाताई बच्छाव

IMG-20231104-WA0066.jpg

राधिका फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम- ३५ नवदुर्गांचा केला सन्मान

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

राधिका फाउंडेशन च्या वतीने नवदुर्गांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांना आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी वेळ देता यावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील नवदुर्गांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या व महिलांना सन्मान देणाऱ्या राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका चेतनाताई सेवक यांचं कार्य खरोखरच अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन विशेष पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
नाशिक येथे श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था यांचा वतीने आगळावेगळा सन्मान आदिशक्ती चा सोहळा
कार्यक्रमात ते बोलत होते.
जिथे कमी तिथे आम्ही हीच आमची ओळख सन्मान सत्कार सोहळा व पदग्रहण सोहळा विद्यार्थी सत्कार सोहळा आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सन्मान सोहळा डॉ. पायखणी देठणकर यांचे योगाविषयी मार्गदर्शन लाभले. डॉ. साक्षी भामरे मार्गदर्शन केले.
सन्मान आदिशक्तीचा पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या प्रारंभी नवदुर्गा जागर राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत कु प्रिया वालझाडे हिने गणेश वंदना
तर लावण्या ढवण हिने जोगवा नृत्य सादर केले.
सन्मान आदिशक्ती चार कार्यक्रम अध्यक्षस्थानी विशेष पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, विभागीय अधीक्षक महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक महिला संरक्षण समिती आशा पाटील ,वसुंधरा दिवेकर प्रसाद सानप ,लाला ठक्कर, राधिका फाउंडेशनच्या
संस्थापिका चेतना सेवक उपस्थित होते या वेळी मान्यवरांचे स्वागत सौ चेतना ताई सेवक यांनी केले.
या कार्यक्रम सोहळ्यात ग्रामीण भागासह तळागाळातील 35 नवदुर्गांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व एक चांगल्या प्रकारची साडी देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते
राधिका फाउंडेशनच्या विस्तारासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी सर्व श्री अध्यक्ष लाला ठक्कर ,उपाध्यक्ष राणी कासार, खजिनदार अनिल नहार, सचिव जावेद शेख, संचालक प्राची राव, संचालक विकी कुटे, पत्रकार विभाग नाशिक जिल्हा अध्यक्ष रामभाऊ आवारे सर निफाड ,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वैशाली सपकाळे नाशिक आदींचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला. याचवेळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मनमाड शाखेची फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करताना मनमाड शाखेच्या अध्यक्ष सुरेखा ताई धुमाळ,सौ सुनीता ताई जगताप, सौ रेखाताई येणारे व सौ सुवर्ण निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आला.दत्तक घेतलेल्या शाळेतील जे मुले उच्च पदाधिकारी झाले त्यांचा सन्मान करण्यात आला.पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त नवदुर्गांतर्फे सौ जयश्री (उमा) चव्हाण वनसगाव,
प्रसाद सानप ,डॉ अर्चना आहेर गणोरकर, ललिता नवघिरे , साई वात्सल्य सेवाभावी संस्था संस्थापक रत्नाताई चांदगुडे शिर्डी , भिमाबाई जोंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

*राधिका फाउंडेशन च्या वतीने केला या नवदुर्गांचा सन्मान*

सौ राणी कासार सौ वसुंधरा दिवेकर सौ स्वाती पठारे सौ रेखा खैरनार सौ सरला एकनाथ शिंदे वनसगाव,कु समीक्षा संदीप डुकरे सारोळे खुर्द,सौ जयश्री (उमा) अर्जुन चव्हाण, लासलगाव,सौ ललिता सोमवंशी, सरपंच सौ शितलताई बबनराव शिंदे थेटाळे,सौ मेघा राजेश शिंपी
सौ ललिता रामदास नवगिरे, ॲड एकता कदम, ललिता सरिता महेश अवजारे, सुशीला प्रभाकर पवार
रत्नाताई चांदगुडे पाटील शिर्डी, सविता सुरेश पाटील, अलका भोईर, संगीता दौलत घेगडे पिंपळगाव बसवंत,
मनीषा कुटे, डॉ पायल सोनार, सतीश सोनार ,सुरेखा कैलास धुमाळ, मनमाड, सुनिता विजय जगताप,सौ सुनिता जगताप, सौ रेखा येणारे मनमाड,पुर्वा मिठारी,
प्राची राव, योगिता सातपुते सौ.वैशाली सपकाळ
राजनंदिनी आहिरे , नगरसेविका स्वाती गाजरे निफाड, लता कोकरे, जाधव, भिमाबाई जोंधळे आदी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका सेवक यांनी केले सूत्रसंचालन अभिजीत सर तर उपस्थितांचे आभार सौ प्राची राव यांनी केले.
यावेळी अभिजीत सर यांनी दोन ऍक्टिव्हिटीज सादर करून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमांमध्ये उपस्थित यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये कुमारी सपकाळे हिने विजेती ठरत पैठणी मिळविली‌. तसेच प्रश्नोत्तराचा तासातही चार महिलांनी पारितोषिक पटकावून उत्साही वातावरण निर्माण केले.यात ॲड विनया नागरे यांना ही पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला अथक परिश्रम करणाऱ्या राणी कासार, विकी कुटे, प्राची राव, राजनंदिनी आहिरे, वैशाली सपकाळे आदींचे सत्कार करुन शब्द सुमनांनी आभार व्यक्त केले.

Previous articleभ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड- कु. संजना संजीव भांबोरे
Next articleदिवाळी अगोदर निरधारांचे अनुदान वाटप करा अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे -देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here