Home Breaking News नांदेड” जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा आकडा ३८७ वर तर आज दिवसभरात १४ व्यक्ती...

नांदेड” जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा आकडा ३८७ वर तर आज दिवसभरात १४ व्यक्ती बाधित, व २ रुग्ण बरे होऊन घरी परले नांदेड,दि. ३० ; राजेश एन भांगे

157
0

नांदेड” जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा आकडा ३८७ वर तर आज दिवसभरात १४ व्यक्ती बाधित, व २ रुग्ण बरे होऊन घरी परले
नांदेड,दि. ३० ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 387 बाधितांपैकी एकुण 283 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत.

नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार 30 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 130 अहवालापैकी 124 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात 4 नवीन बाधित व्यक्ती आढळले होते, या बाधितांमध्ये छत्रपती चौक येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 32 वर्षाची 1 महिला, हदगाव तालुक्यातील पळसा या गावातील 16 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील 56 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे तर यातील दोन रुग्ण 29 जून रोजी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालातील आहेत तर दोन रुग्ण आज सायंकाळी 5:00 वाजताच्या अहवालातील आहेत. व आज संध्याकाळी 30जून 2020 रोजी 7 वाजता आणखी 25 अहवाल प्राप्त झाले, व त्यामध्ये 9 अहवाल निगेटिव्ह तर 12 नवीन रुग्ण पॉसिटीव्ह आढळून आले होते.

✔️त्या 12 रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

☑️बाफना, नांदेड येथील दोन पुरुष रुग्ण वय : 28 व 64

☑️आंबेडकर नगर, नांदेड येथील दोन रुग्ण एक पुरुष वय 33व एक 5 वर्षी बालिका

☑️असर्जन नांदेड येथील 4 रुग्ण यात महिला रुग्ण वय : 37, 10 व 11एक पुरुष रुग्ण वय : 42

☑️विनायक नगर, नांदेड येथील एक महिला रुग्ण वय : 34

☑️मुक्रमाबाद, मुखेड येथील 2 रुग्ण एक पुरुष वय 20 व एक महिला रुग्ण वय -38

☑️वसंत नगर नांदेड येथील एक पुरुष रुग्ण वय : 52,

अशाप्रकारे आज नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवारी रात्री उशीरा 2 रुग्ण, आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 रुग्ण, व आता रात्री 7 वाजता आढळलेले 12 रुग्ण असे दिवसभरात एकूण 16 रुग्णांची नोंद झाली आहे. व या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 387 एव्हढी झाली आहे.

तर सोमवार 29 जून रोजी सायंकाळी नवीन कौठा नांदेड येथील 53 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या बाधितावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 17 वर गेला आहे.

✔️जिल्ह्याची कोरोना अहवालाची माहिती पुढील प्रमाणे आहे :

☑️ आज दिवसभरात 14 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 387 वर.

☑️ दिवसभरात 2 रुग्णांना सुट्टी.

☑️ आत्तापर्यंत 283 बरे होऊन घरी .

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️17 कोरोना पॉसिटीव्ह.
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️87 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 4 महिला 6 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

☑️ उपचारास्तव 7 रुग्ण औरंगाबाद 1 सोलापूर
येथे संदर्भीत.

उपचार घेत असलेल्या 87 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 10 बाधितांची (4 महिला आणि 6 पुरुष बाधित ) प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.तर 7 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले.

मंगळवार 30 जून रोजी 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल. असे नांदेड आरोग्य विभागाचा प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✅️नांदेड आरोग्य विभागाचे महत्वाचे आवाहन!

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here