🛑 पुणे – पिंपरी चिंचवडवर लाँकडाऊनचे सावट ???.. 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलीकरणात नागरिकांची गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढेल, अशी भीती प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत. तर, अधिकृत सूत्र या बाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे बोट दाखवित आहेत.
पुण्यात कोरोनाचे रविवारी तब्बल 620 रुग्ण सापडले आहेत. तर शहरातील रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता वाढली आहे. कडक उपाययोजना केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असाही सूर उमटत आहे
दुसरीकडे केंद्र सरकारच्या पथकाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार असून त्यानुसार काळजी घेण्याचा आदेश पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिला आहे. मुंबईतही परिस्थिती गंभीर होत असल्याचे रुग्णांच्या वाढत असलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे. त्यातच दोन्ही शहरांतील बाजारपेठा नागरिकांनी गजबजलेल्या आहेत. त्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे.
नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवड येत्या दोन दिवसांत पुन्हा सील होणार आहे, तेथे पुन्हा लॉकडाउन होईल, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले आहेत. पुण्यातही या मेसेजसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांत भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करताना त्यात आणखी मजकूर समाविष्ट केला जात असल्याचेही उघड झाले आहे.
पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे म्हणाले, ”लॉकडाउन वाढविण्याबाबत राज्य अथवा केंद्र सरकार निर्णय घेते. स्थानिक पातळीवर असा निर्णय होत नाही. राज्य सरकारने 1 जून रोजी दिलेल्या आदेशानुसारच सध्या काम सुरू आहे. कंटेनमेंट झोनची संख्या कमी करणे किंवा वाढविणे, हे स्थानिक प्रशासनाच्या हातात आहे. त्यामुळे काम सुरू आहे.”
महापालिका आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांनी, ”रुग्णांची संख्या वाढत असली तरी, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशांनुसार सध्या काम सुरू आहे. या बाबत त्यांचे सुधारित आदेश येतील, त्यानुसार अंमलबजावणी करू. स्थानिक स्तरावर लॉकडाउनचा निर्णय अद्याप झालेला नाही. ” असे सांगितले….⭕