• Home
  • नाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा  मराठा  न्युज  ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली

नाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा  मराठा  न्युज  ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली

नाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा  मराठा  न्युज  ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली आहे. भाऊ सतत भांडण करतो म्हणून सख्या भावाला वैरी बनण्याची वेळी आली आहे. लहाने भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याने घटना स्थळी रक्ताचा पाट वाहिल्याने खळबळ उडाली आहे.

संतोष आणि सुनील दोघे संख्येभाऊ आपल्या कुटूंबासह मखमालाबाद रोडवरील रो-हाऊसमध्ये राहत आहे. संतोष थोरे याला दारूचे व्यसन असल्याने घरातील सदस्यांना कायमच त्रास देत असे. एवढ नाही मोठा भाऊ काहीही कामधंदा करीत नाही. नेहमीच दारू पिऊन घरात वाद घालतो. त्याच्या या वागण्याने काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून निघून गेेली. आज (ता.२३) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तो दारू पिऊन त्याचा भाऊ सुनील हा काम करीत असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट मध्ये गेला. त्याठिकाणी पुन्हा वाद झाल्याने सुनील याने त्याला गाडीवर बसवून घरी घेऊन जात असताना पेठरोड वरील नामको हॉस्पिटल रस्त्यावर मला दारू पिण्यास जायचे असल्याचे सांगत पुन्हा वाद घातला. यावेळी संतापलेल्या सुनील याने गाडी थांबवून रस्त्यावर असलेला दगड उचलून धाकटा भाऊ संतोष याच्या डोक्यावर मारला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयीत सुनील थोरे याला घरातून ताब्यात घेतले.

anews Banner

Leave A Comment