आशाताई बच्छाव
रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळित
चोपडा जळगाव प्रतिनिधी :सुरेंद्र बाविस्कर
अमळनेर: भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना १५ रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वे चे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवाश्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.