आशाताई बच्छाव
आत्ताची मोठी बातमी….
उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहणार? बातमी खरी की खोटी! वाहनधारकांची पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी….
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव दि.९:- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून संपूर्ण देशातील पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या बातमीने वाहनधारकात चलबिचल माजली असून, मालेगाव शहर व तालुक्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी तुंबळ गर्दी झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज एका युट्यूब वृत्तवाहिनीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसारीत झाल्यानंतर पेट्रोल पंपावर गर्दी उसळली आहे.तर उद्यापासून खरोखरच पेट्रोल पंप बंद राहणार की ही निव्वळ अफवा ठरणार याबाबत कुठलीही खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान पेट्रोल पंप चालक मात्र वाहनधारकांना मोठ मोठ्या बँरल मधून पेट्रोल व डिझेल विक्री करीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.