आशाताई बच्छाव
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प धरणग्रस्तांची 13 एप्रिल ला अंभोरा येथे परिषद
36 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांना न्याय नाही
धरणग्रस्तांच्या परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
संजीव भांबोरे
नागपूर –गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संबंधात 13 एप्रिल 2025 ला रविवारी सकाळी 10.30 गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प धरणग्रस्तांची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे .या बैठकीला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी द्विजेन्द्रजी शर्मा सेवानिवृत्त न्यायाधीश हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे करणार आहेत .तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य हे राहणार आहेत .तर विशेष अतिथी म्हणून संजय मेश्राम आमदार उमरेड विधानसभा हे राहणार आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, 22 एप्रिल 1988 ला गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन झाले .आज 36 वर्षाच्या दीर्घकाळ लोटल्यानंतरही धरणाचे काम पूर्ण होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झालेले नाही. आणि धरणग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमारांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत .शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे अनेक समस्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत .त्यात प्रामुख्याने धरणग्रस्तांचे दाखले निरस्त करण्यात आले ,पर्यायी शेत जमिनीचा लाभ पूर्णता मिळालेला नाही ,नोकरी ऐवजी एक मुस्तरकमेचा लाभ देताना गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्यात आलेला आहे, कलम 18 व 28 (ए )चे प्रकरणे न्यायालयान प्रक्रियेत अडवून ठेवण्यात आलेले आहेत ,पर्यायी गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण आहेत पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही ,मौजा नेरला व मौजा सुरबोटी या गावाचे अधिग्रहण करण्यात आले नाही, धरणग्रस्तांना जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्यात आले नाही ,असे असतानाही गोसेखुर्दरणातील पाण्यावर वैनगंगा -नळगंगा हा 88 हजार कोटीचा नदीजोड प्रकल्प निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे, या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांना जाणून घेऊन त्यांना वाचा फोडण्या साठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त समिती, शेतकरी शेतमजूर व मच्छीमार कृती समितीतर्फे व भंडारा जिल्हा गोसीखुर्द पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे यांनी केलेले आहे .






