Home उतर महाराष्ट्र जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघे ताब्यात

जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघे ताब्यात

117

आशाताई बच्छाव

1001407746.jpg

जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघे ताब्यात

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 
जिल्हा रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने १३ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन शंकर बडे, सागर भानुदास केकाण असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे डॉ. साहेबराव डावरे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे दोघे पसार झाले होते. या घटनेचा तपास करत असता तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार बडे व केकाण हे पाथर्डी तालुक्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Previous articleमहात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने  विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप
Next articleगोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प धरणग्रस्तांची 13 एप्रिल ला अंभोरा येथे परिषद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.