Home उतर महाराष्ट्र महात्मा फुलेंमुळे स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम- केतन खोरे

महात्मा फुलेंमुळे स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम- केतन खोरे

131

आशाताई बच्छाव

1001407786.jpg

महात्मा फुलेंमुळे स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम- केतन खोरे

प्रतिनिधी(श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्मलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुलेंमुळे संपूर्ण भारत देशात स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम बनला असून आज सर्व क्षेत्रात महिलांची आघाडी महात्मा फुलेंच्या पुण्याईमुळे असल्याचे प्रतिपादन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी महात्मा फुलेंच्या १९८ व्या जयंतीनिमित्त केले.
गुलमोहर कॉलनी येथे महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना खोरे म्हणाले की, थोर समाजसेवक, स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम रोवणारे महात्मा फुले यांच्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिलांना काम करण्याची संधी मिळाली असून देशाला क्रांतिकारी दिशा देणारे समाजसुधारक महाराष्ट्राच्या मातीत घडल्याचा अभिमान वाटतो. यावेळी माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, निवृत्त नायब तहसीलदार अनिल उनवणे, सोपान शिंदे, विलास भगत, विवेक भोईर, राहुल सागडे, तृप्ती भगत, सविता घोडेकर, मनीषा बर्डे, अनिता गोरे, रेखा होते, अनिता पाटील, वर्षा भोईर, प्रज्ञा उनवणे, समीक्षा भगत, शौर्यजा खोरे आदी उपस्थित होते.

Previous articleगोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प धरणग्रस्तांची 13 एप्रिल ला अंभोरा येथे परिषद
Next articleयुवा मराठा”चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांना ‘दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्कार’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.