Home उतर महाराष्ट्र युवा मराठा”चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांना ‘दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्कार’

युवा मराठा”चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांना ‘दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्कार’

167

आशाताई बच्छाव

1001407794.jpg

“युवा मराठा”चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांना ‘दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्कार’

श्रीरामपूर – भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि दादासाहेब रूपवते यांची जन्मशताब्दी या त्रिसंगमाच्या प्रेरणादायी निमित्ताने संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित भव्य समारंभात दिपक कदम यांना ‘दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या मा. उत्कर्षाताई रूपवते, प्रसिद्ध विधीतज्ञ मा. अॅड. संघराजजी रूपवते, तसेच प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्रा. श्रीरंजन आवटे, प्रा. मिलिंद कसबे आणि प्रा. राहुल गोंगे या मान्यवरांच्या हस्ते दिपक कदम यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने त्यांच्या सामाजिक कार्यास अधिकृत मान्यता मिळाली असून, वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांच्या संघर्षशील योगदानाची पावती देण्यात आली आहे.

समारंभास माजी महसूल मंत्री मा. आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार मा. आ. लहु कानडे, माजी आमदार मा. आ. सुधीर तांबे, मा. सौ. दुर्गाताई तांबे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात पार पडला.

दिपक कदम यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य, सामाजिक न्यायासाठी घेतलेली भूमिका, आणि परिवर्तनवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग या सर्व कारणांमुळे त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यास उचित गौरव मिळाला आहे. समाजातील बदल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने एक प्रेरणादायी उदाहरण मिळाले आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Previous articleमहात्मा फुलेंमुळे स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम- केतन खोरे
Next articleडि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर येथे सिनियर के.जी. विभागाचा पदवीधर समारंभ संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.