Home भंडारा शेळीवर गोंडसावरीत बिबट चा प्राणघातक हल्ला लाखनी येथे लांडग्यांच्या हल्यात शेळी ठार

शेळीवर गोंडसावरीत बिबट चा प्राणघातक हल्ला लाखनी येथे लांडग्यांच्या हल्यात शेळी ठार

159

आशाताई बच्छाव

1001377196.jpg

शेळीवर गोंडसावरीत बिबट चा प्राणघातक हल्ला

लाखनी येथे लांडग्यांच्या हल्यात शेळी ठार

संजीव भांबोरे
भंडारा-आज दिनांक – 02/04/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता मौजा गोंडसावरी येथिल मनोहर देवा मेश्राम व मधुकर विठोबा राऊत यांच्या मालकीच्या शेळ्यावर वण्यप्राणी बिबटने हल्ला करुन जखमी केल्याची तसेच मौजा लाखनी येथील अशोक वासुदेव गिऱ्हेपुंजे यांच्या मालकीच्या शेळीला वन्यप्राणी लांडग्याने हल्ला करुन ठार केल्याची माहिती मिळाल्याने, एस.पी.गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी,यांच्या मार्गदर्शनात जे.एम.बघेल क्षेत्र सहाय्यक लाखनी, कुं.त्रिवेणी.जी.गायधने बीट रक्षक, बीट मदतीस मयुर गायधने, दिनेश शेंद्रे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन जखमी तसेच मृत शेळ्यांची पाहणी करुन पंचनामा नोंद केला. व डाँ पशुवैधकीय अधिकारी यांनी सदर जखमी शेळ्यावर उपचार करुन मृत शेळीचे शवविच्छेदन केले, शेळीचे अंदाजे वय 8 ते 9 महिने होते ,
अशा घातक जीवघेण्या हल्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई लवकर देण्यात यावे अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे ,मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलन करू असे प्रतिनिधी ला सांगण्यात आले.

Previous articleईसाफ बँक तर्फे अभिषेक मेश्राम यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस
Next articleग्रामीण भागातील विद्यार्थी चक्क साधतात 12देशातील भाषेत संवाद. (
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.