आशाताई बच्छाव
आमचा राष्ट्रीय ग्रंथ मनुस्मृती नसून भारतीय संविधान आहे:- परिता रामटेके
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)आजही मनुस्मृती ला मानणारे काही लोक मनुस्मृतीचे डोके वर काढत आहेत. मनुस्मृतीने महिलांना शिक्षण नाकारलं ,सती प्रथेच्या समर्थन केले व महिलांना पायाखालची चप्पल समजल्या गेली. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी भारतीय राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला समता मिळाली. शिक्षणाचा अधिकार मिळाला. आज मनुस्मृती पासून नव्हे तर भारतीय राज्यघटनेमुळे आम्ही आज राष्ट्रपती, पंतप्रधान व मोठमोठ्या पदावर पोहोचलो. हे राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान असे मत परिता रामटेके यांनी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या त्रीमुक्ती दिवस या विषयावर बोलताना भंडारा विश्रामगृहात आपले मत व्यक्त केले.
याप्रसगी
भंडारा महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवें ,प्र .जिल्हाध्यक्ष डी जी रंगारी, धनपाल गडपायले, , चेतना मेश्राम यांच्या उपस्थितीत होते.
पुढे ते म्हणाले की स्वातंत्र्य, समता ,बंधुता व सामाजिक न्याय हे आपल्या राज्यघटनेतील अनमोल ठेवा आहे त्यामुळे आपल्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते .पण भारतीय राज्यघटनेतील जे नियम आहेत ते अभ्यास करून आपण त्याच्या चिंतन करून अमलात आणले पाहिजे असेही ते म्हणाले .त्यानंतर
डी जी रंगारी, धनपाल गडपायले, , सी डी गवरे, तनुजा नागदेवें यांनी मनुस्मृति दहन व स्त्री मुक्ती दिवस याविषयी मार्गदर्शन केले
याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील, सुरेश खंगार ,राधेश्याम कावळे, शि डी गवरे, यादोराव गणवीर, गणेश गजभिये,पवित्रा भोवते, रवींद्र मेश्राम ,नितीन गजभिये,
इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
परभणी प्रकरणात पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.






