Home उतर महाराष्ट्र केंद्रीय मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा निषेध; बसपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

केंद्रीय मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा निषेध; बसपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

99

आशाताई बच्छाव

1001083877.jpg

केंद्रीय मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा निषेध; बसपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने                    नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा बहुजन समाज पक्षाच्या वतीने मंगळवार जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निषेध नोंदविला. केंद्रीय मंत्री शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व बहुजन समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, उत्तर जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे, सलीम अत्तार, राहुरी विधानसभेचे अध्यक्ष संजय संसारे, सुनील मगर, नितीन जावळे, शहर प्रभारी गणेश बागल, रवी कुमार आदी उपस्थित होते.

Previous articleचलो मेळघाट’ मोहीमेतुन हजारो आदिवासी बांधवांना मिळाली नवसंजीवनी
Next articleआमचा राष्ट्रीय ग्रंथ मनुस्मृती नसून भारतीय संविधान आहे:- परिता रामटेके
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.