Home नांदेड डॉ.धनश्री अंकित वडजे यांच्या डेंटल क्लिनिकचा अभिनव उपक्रम.

डॉ.धनश्री अंकित वडजे यांच्या डेंटल क्लिनिकचा अभिनव उपक्रम.

64
0

आशाताई बच्छाव

1001035717.jpg

डॉ.धनश्री अंकित वडजे यांच्या डेंटल क्लिनिकचा अभिनव उपक्रम.
▪️ शिबिराच्या माध्यमातून 350 दंतरुग्णांची मोफत तपासणी.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड शहरातील वडजे डेंटल क्लिनिकचा वर्षपूर्ती सोहळा निमित्ताने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभरात अत्यंत कमी दरात दर्जेदार उपचार देत गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देत डॉ. धनश्री अंकित वडजे यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. वडजे डेंटल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारचे दंत उपचार माफक दरात उपलब्ध आहेत. आर्थिक दृष्ट्या
दुर्बल रुग्णांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे दंत तपासणी रूट कॅनल, ब्रेसेस, दंत स्वच्छता व पॉलिशिंग, दंत प्रत्यारोपण, नवीन दात लावण्याची सुविधा, बालदंत चिकित्सा आणि इतर उपचार अत्यंत कमी खर्चात केले जातात. वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त दिनांक ९ डिसेंबर व १० डिसेंबर रोजी सर्वांसाठी मोफत दंत तपासणी मोफत औषधी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये ३५० रुग्णांनी आपले तपासणी अन्य चिकित्सा विषयी मार्गदर्शन घेतले असून आलेल्या सर्व रुग्णांनी डॉ. धनश्री अंकित वडजे यांच्याकडून मिळालेल्या उपचाराबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. आलेल्या रुग्णांना त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपचार व समाधानकारक वागणूक मिळाल्याबद्दल रुग्णांकडून आनंद व्यक्त होत आहे. दंत रुग्णाविषयी माहिती दर तीन महिन्यांनी ब्रश बदलला पाहिजे तर सहा महिन्यांनी दातांची तपासणी केली पाहिजे माझ्या प्रवासामध्ये रुग्णांनी व कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. तसेच वैद्यकीय संस्था मुखेड व सर्व डॉक्टरांचे आभार मानते.पुढील काळात व्यापक दृष्टिकोन ठेवून नवीन तंत्रज्ञान द्वारे रुग्णांना सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.

Previous articleनायगाव तहसील कार्यालयावर बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकार,मालमता नुकसान व हत्याच्या निषेधार्थ हिंदूंचा आक्रोश मोर्चा धडकला
Next articleपत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द -डी टी आंबेगावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here