Home भंडारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान घरोघरी पोहोचविण्याची गरज...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान घरोघरी पोहोचविण्याची गरज –आंबेडकरी विचारवंत नितीन कारेमोरे

104

आशाताई बच्छाव

1000282151.jpg

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान घरोघरी पोहोचविण्याची गरज –आंबेडकरी विचारवंत नितीन कारेमोरे

संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा( प्रतिनिधी)आज दिनांक १३ एप्रिल 2024ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास नितीन कारेमोरे आंबेडकरवादी विचारवंत व शिवचरित्र प्रसारक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची व संविधान प्रत्येक घरात पोहचण्यासाठी गरज असल्याचे प्रतिपादन भोजापूर येथे मैत्रेय भीम बुद्ध जयंती समारोह समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णुजी मडावी होते तर प्रमुख पाहुणे गौतम मेश्राम, वैद्य सर , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ प्रज्ञा घोरपडे यांनी केले. आभार खोब्रागडे सर यांनी मानले. तसेच या कार्यक्रमासाठी किरण मेश्राम सर ,राहुल बोरकर उद्धवजी बडोले, मिलिंद जनबंधू घोरपडे, बारसागडे सर आणि प्रमोद वानखेडे यांनी अतिशय परिश्रम घेतले .त्यानंतर संविधान भारती यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला . त्यांनी आपल्या समाज प्रबोधनातून समाज एक संघ कसा राहिलाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे कार्य त्याबद्दल प्रसंसनीय गीत गायन केले.

Previous articleवृक्ष भेट देऊन केली रमजान ईद साजरी
Next articleश्री संत गजानन महाराज दिव्य संगीतमय चरीत्र कथा सोहळा. दरबार गजाननाचा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.