Home भंडारा मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी शहरात आले पाईपलाईन पूर्ववत केली परंतु आज पाण्याचा अपव्यय...

मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी शहरात आले पाईपलाईन पूर्ववत केली परंतु आज पाण्याचा अपव्यय सुरू

207

आशाताई बच्छाव

1000271541.jpg

मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी शहरात आले पाईपलाईन पूर्ववत केली परंतु आज पाण्याचा अपव्यय सुरू

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) काल दिनांक 8 एप्रिल 2024 ला भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हे भंडारा शहरात आले होते. स्थानिक नगर प्रशासनाने शहरातील शास्त्री चौकातील पाण्याचा मोठा पाईप तुटल्याने शास्त्री चौकात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे तो तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता. ही पाईपलाईन पुन्हा फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे .त्यामुळे भंडारा शहरातील जलपुरवठा योजना नागरिकांच्या दृष्टीने असफल ठरत आहे. शहरातील नागरिकांना प्रशासनाच्या चुकीमुळे पाणी मिळत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शास्त्री चौकातील जलपुरवठा लाईन योजना पूर्ववत दुरुस्त करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर खोब्रागडे यांनी केलेली आहे.

Previous articleरामकृष्ण कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन
Next articleटेंभुर्णी पोलीस ठाणे कडून अत्यंत महत्त्वाच्या सूचना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.