Home बुलढाणा मोताळा तालुक्यात अंगणवाडी मदतनीसचा विनयभंग, गुन्हा दाखल

मोताळा तालुक्यात अंगणवाडी मदतनीसचा विनयभंग, गुन्हा दाखल

118

आशाताई बच्छाव

IMG_20240325_150720.jpg

मोताळा तालुक्यात अंगणवाडी मदतनीसचा विनयभंग, गुन्हा दाखल

मोताळा : युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

मोताळा । एका ३२ वर्षीय अंगणवाडी मदतनीसचा
विनयभंग करण्यात आल्याची घटना २३ मार्च रोजी
सकाळी शहरात घडली. या प्रकरणी फिर्यादीवरून
बोराखेडी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
केला आहे. अंगणवाडी मदतनीसने बोराखेडी
दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, २३ मार्च रोजी
सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मोहम्मद उमेर
अ. रशीद याने हात पकडून ‘तुझा मोबाइल नंबर का
देत नाही’ असे म्हणत विनयभंग केला. तसेच
पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी
दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहम्मद उमेर अ.
रशीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.