Home जालना शेतकऱ्यांच्या ठिबकची चोरी करणारी टोळी पारध पोलीसांनी केली मुददेमालासह जेरबंद.१० लाख ३६...

शेतकऱ्यांच्या ठिबकची चोरी करणारी टोळी पारध पोलीसांनी केली मुददेमालासह जेरबंद.१० लाख ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

58
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_194350.jpg

शेतकऱ्यांच्या ठिबकची चोरी करणारी टोळी पारध पोलीसांनी केली मुददेमालासह जेरबंद.१० लाख ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 25/03/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,
भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासुन शेतक-यांनी आप-आपल्या शेतातील ठिबक गोळा करुन एकत्रित जमा करुन ठेवलेली असतांना काही लोक त्याची दिवसा पाहणी करुन रात्रीच्या वेळेस गाडयामध्ये टाकुन चोरुन घेउन जात होते. अशा तक्रारी पोलीस ठाणे पारध येथे आलेल्या होत्या त्यावरुन दिनांक १५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात गुरनं ५०/२०२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे ठिबक चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास चालु आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु असतांना पारध पोलीस ठाण्याचे सपोनि चैनसिंग गुसिंगे यांना माहीती मिळाली होती कि, दिनांक १५ मार्च रोजी वालसावंगी शिवारातील ठिबक चोरी झालेली आहे .ते ठिबक जामनेर जि.जळगाव येथील आरोपी यांनी पिकअप मध्ये टाकुन चोरुन नेले असुन सदर आरोपी हे शुक्रवारी रात्री परत पिकअप क्रं. एम.एच.१९, बी.एम.३३९७ घेवुन येणार आहे अशी माहीती प्राप्त झालेली होती.त्यावरुन सपोनि चैनसिंग गुसिंगे यांनी सदर आरोपी यांना पकडण्यासाठी वेगवेगळे पथक नेमले होते.दिनांक २३/०३/२०२४ रोजी पहाटे ०३ वाजेच्या सुमारास एका पिकअप बोलेरो मध्ये चोरीचे ठिबक वडोदतांगडा कडुन धावडा कडे जाणा-या रोडने जात आहे अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस अंमलदार भगत राजपुत, शिवाजी भगत, होमगार्ड पोपळघट यांनी पोखरी गावाजवळ सदर वाहणाला हाथ् दाखवुन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यांनी वाहन न थांबवता सुसाट वेगाने पळवले.त्यांनतर पोलीसांनी सदर वाहणाचा पाठलाग करुन धावडा गावाजवळ सदर पिकअप बोलेरो वाहन पकडले .सदर बोलेरो पिकअप मध्ये पुर्ण ठिबक भरलेले होते. तसेच सदर पिकअप मध्ये तीन ईसम मिळुन आल्याने त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव ०१) शेख रहीम रौफ मनियार, वय-२१ वर्षे, ०२) शेख साबीर शेख रशीद, वय २२ वर्षे, ०३) रेहान अली रिजवान वय २१ वर्षे, सर्व रा-जामनेर, जि-जळगाव असे सांगितले. त्यानंतर सदर आरोपी यांना पिकअप मधील ठिबक बाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि सदर ठिबक हे विझोरा ता -भोकरदन आणि जनुना ता-बुलडाणा येथुन चोरुन आणले आहे. तसेच सदर आरोपी यांनी दिनांक १५/०३/२०२४ रोजी वालसांवगी शिवारातील ठिबक सुध्दा आम्हीच चोरुन नेल्याचे सांगितले तसेच सदर चोरुन नेलेले ठिबक जळगाव येथे विक्री केल्याचे सांगितले आहे सदर आरोपी यांच्याकडुन ०१) पोलीस ठाणे पारध गुरनं ५६/२०२४ कलम ३७९ भादवी ०२) पोलीस ठाणे धाड,जि बुलडाणा गुरनं ९०/२०२४ कलम -३७९ भादवीमधील २ लाख,३६ हजार रुपयाचे ठिबकासह एकुण १० लाख ३६हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला. तसेच पोलीस ठाणे पारध गुरनं ५०/२०२४ कलम ३७९ भादवी मधील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, आतापर्यत एकुण तीन गुन्हे उघड झाले असुन सदर आरोपी यांच्याकडे आणखी गुन्हे उघड होणार आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी , उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी चैनसिंग गुसिंगे,पोलीस उपनिरिक्षक श्री.वाल्मीक नेमाने,पोलीस अंमलदार प्रदिप सरडे, प्रकाश सिनकर,भगतसिंग राजपुत, नितेश खरात, जिवन भालके, संतोष जाधव, शिवाजी जाधव, शिवाजी भगत,अनुराज वाठोरे,गृहरक्षक दलाचे कर्मचारी पोपळघट यांनी केली आहे.

सदरील आरोपींना भोकरदन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींकडून अजून चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू आहे
सपोनि चैनसिंग गुसिंगे

Previous articleअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सेमाडोह जवळ एसटी बस दरीत कोसळली, २ मृत्यू व 25 जखमी.
Next articleमोताळा तालुक्यात अंगणवाडी मदतनीसचा विनयभंग, गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here