Home भंडारा सर्व पुरोगामी विचारधारेच्या राजकीय पक्षाने मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे-प्रा श्याम मानव

सर्व पुरोगामी विचारधारेच्या राजकीय पक्षाने मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे-प्रा श्याम मानव

163

आशाताई बच्छाव

IMG_20240208_173934.jpg

सर्व पुरोगामी विचारधारेच्या राजकीय पक्षाने मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे-प्रा श्याम मानव

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) सरकार प्रेताच्या ढिकार्‍यावर राजकारण करत आहे. फोडाफोडीचे राजकारण सध्या सुरू आहे .भारतीय संविधान धोक्यात आलेले आहे. ते वाचविण्याकरिता सर्व पुरोगामी विचारांच्या राजकीय पक्षाने आपली काही मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे , या मोदी सरकारच्या 2024 मध्ये उलटवून टाकले पाहिजे , धिरेद्रशास्त्री वर जादूटोणा कायदाविरुद्ध कारवाई न होऊ देण्यामागे विद्यमान गृहमंत्र्याच्या हात आहे ,संभाजी भिडे आमच्या थोर महापुरुषांच्या अपमान करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही ,ते आमचे गुरुजी आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणतात.
हा लढा हुकूमशाही दडपशाही विरुद्धच आहे .शेतकरी बेरोजगार ,महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे .सर्व पुरोगामी राजकीय पक्षाने आपले मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे
मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा .श्याम मानव यांनी साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंड येथे भारतीय संविधान व लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान करताना संविधान बचाव कृती समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष रोशन जांभुळकर होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक सुरेश खोब्रागडे ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमूरे, सभापती मदन रामटेके , माजी सभापती रेखाताई वासनिक, माजी जि प सदस्य डॉ अशोक कापगते , अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक व कार्यक्रमाचे आयोजक डी जी रंगारी,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे
इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .समितीचे राष्ट्रीय कार्य सुरेश झुर्मुरे यांनी सांगितले की ,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 41 वर्षाचा कार्याचा आढावा घेत समितीची भूमिका व उद्देश किंवा समितीचे कार्य हे संविधानाच्या चाकोरीतून होत असून प्रा श्याम मानव आम्हाला हे अन्यायाविरुद्ध पूर्वीपासून लढत आले असून तरुणपणापासून ते शांती सेनेत तसेच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत असताना तसेच इंदिरा गांधी यांनी 1975 ला लावलेल्या इमर्जन्सी विरोधात काम करत असताना त्यांना त्यावेळी तुरुंगवास झालेल होता तेच श्याम मानव सतत अन्यायाविरुद्ध लढत असून आम्हाला संविधान व लोकशाही वाचवण्याकरिता सर्वांनी एकत्र आल्या पाहिजे अशी भूमिका मांडत आहेत असे मत राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांनी व्यक्त केले .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश खोब्रागडे यांनी सांगितले की ,सभेला प्रा शाम मानवच्या सभेला क्रांतीचे वलय आहे ते नेहमी संघर्ष करत त्यांनी तुरुंगवास भोगला भोगला पुरोगामी महाराष्ट्रावर वारंवार संकट येत असताना त्यांना तोंड ते नेहमी देत असतात त्यांच्यावर हल्ले होण्याची अधून मधून आम्ही बातम्या ऐकत होतो तरीपण ते समर्थपणे काम करत आहेत अशा या आजच्या दिवसाला प्रा मानवाच्या कार्याला आमच स्यालुट आहे ही सभा ही साधीसुधी नसून विवेकवाद, बुद्धी प्रामण्यवाद मांडण्याचा प्रयत्न करतात तर्क करून, विचार करून ऐका सत्याचा शोध घेण्याकरिता खोलात जावे लागते बुद्ध हा जगातला पहिला विज्ञानवादी पुरुष आहे .त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा आपल्याला घटनेने अधिकार दिलेले आहेत ते आपण विचारलं पाहिजे असे मत प्राध्यापक सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले .याप्रसंगी संविधान बचाव संघर्ष समितीचे आयोजक व भंडारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी ,माजी समाज कल्याण सभापती रेखा वसनिक , डॉ अशोक कापगते यांचेही भाषणे झालेत .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डी जी रंगारी यांनी केले. संचालन कागदराव रंगारी यांनी केले. तर आभार समितीचे साकोली चे अध्यक्ष भाऊराव मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कल्पनाताई सांगोळे ,मदन बांडेबुचे ,मूलचंद कुकडे ,प्राध्यापक अशोक गायधने, कीर्ती गणवीर, रमेश गोटेफोडे ,यशवंत उपरीकर, कल्पना सांगोळे, अशोक रंगारी, विजय देवगिरकर, नरेश रामटेके, राहूल डोंगरे, भीमराव मोटघरे, डी ए मारवादे, अमित नागदेवे, ,यादवराव गणवीर, तनुजा नागदेवे, आश्विन रंगारी ,आकाश राऊत व इतर संपूर्ण कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .या कार्यक्रमाला जवळपास 2500 हजार लोकांची उपस्थिती होती.

Previous articleकामगारांना प्रत्येक तालुक्यात किटचे वाटप करा- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Next articleडॉ. आंबेडकर वसाहतींमध्ये रमाई आंबेडकर जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.