Home उतर महाराष्ट्र डॉ. आंबेडकर वसाहतींमध्ये रमाई आंबेडकर जयंती साजरी

डॉ. आंबेडकर वसाहतींमध्ये रमाई आंबेडकर जयंती साजरी

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_174242.jpg

डॉ. आंबेडकर वसाहतींमध्ये
रमाई आंबेडकर जयंती साजरी
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
टिळकनगर श्रीरामपूर: ( प्रतिनिधी दिपक कदम)
दत्तनगर येथील डॉ. आंबेडकर
वसाहतीमध्ये त्यागमूर्ती
माता रमाई आंबेडकर यांची
जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
व माता रमाई आंबेडकर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर पी.एस. निकम यांनी
संविधान प्रास्ताविकेचे वाचन
केले. याप्रसंगी माता रमाई
यांच्या जयंतीचे औचित्य साधून
सामजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या शिक्षिका,अंगणवाडी
सेविका व मदतीस यांना
माता रमाई आंबेडकर पुरस्कार
देवून गौरविण्यात आले. नुकतीच डॉक्टरेट पदवी
संपादन केलेल्या अशोक
महाविद्यालयाच्या प्राचार्या
प्रा.डॉ. सुनिताताई गायकवाड
तसेच सौ. रोजलिन निकम मॅडम ,सामाजिक कार्यकर्त्या
लक्ष्मीबाई कांबळे , अंगणवाडी
सेविका श्रीमती आशाताई ब्राम्हणे यांना माता रमाई
आंबेडकर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच
भारतीय संविधानाच्या
अमृतमहोत्सवानिमित्त
आर.पी.नेते राजाभाऊ कापसे
जिल्हा विभागीय प्रमुख
भिमाभाऊ बागुल, राकेशभाऊ
कापसे यांच्या वतीने उपस्थित
मान्यवरांना संविधान प्रतींचे
वाटप करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीत डॉ. आंबेडकरांना साथ देणाऱ्या
डॉ.आंबेडकर यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या
प्रेरणा बनलेल्या मातृत्व आणि
कर्तृत्वाची शक्ती माता रमाई
आंबेडकर यांच्या त्यागाची
आठवण आपण ठेवली पाहिजे
हिच त्यांना आदराजंली ठरेल
असे विचार भा.ज.पा. चे
तालुका अध्यक्ष दीपक आण्णा
पटारे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी भा.ज.पा.चे
प्रदेश सरचिटणीस व
श्रीरामपूर विधानसभा प्रभारी
नितिनजी दिनकर ,आर पी. आय.चे जिल्हा विभागीय प्रमुख भिमाभाऊ बागुल
जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा
त्रिभुवन , भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदिपभाऊ मगर
रांजणखोलचे सरपंच बाळासाहेब ढोकचोळे यांनी
मनोगत व्यक्त करून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमास श्रीरामपूर कृषि
उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे ,
पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे
तालुकाध्यक्ष संतोषजी मोकळ ,
राहाता कृषि उत्पन्न बाजार
समितीचे संचालक सुभाषभाऊ
गायकवाड , अँड मिलिंद गायकवाड , कामगार नेते
अशोकराव बोरगे , दत्तनगरचे
पोलीस पाटील राजु गायकवाड
जनाभाऊ खाजेकर , ग्रा.प. सदस्य सागरभाऊ भोसले ,
राजेंद्र मगर , संजय बोरगे
राजेंद्र खाजेकर , संदिप यादव डॉ .अशोक शेळके ,
संदिप बागुल,कार्लस गायकवाड , सौ. लिनाताई
केदारी ,अलकाताई गायकवाड
ज्योती गायकवाड , पुनम ब्राम्हणे , सौ क्षावेरी बोरगे
सौ. धनश्री भोसले, सौ. जयश्री
भोसले , उषा बोधक , प्रकाश
आल्हाट , किशोर पठारे आदी
सह महिला , युवक व ग्रामस्थ
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बौद्धाचार्य सी.एस. बनकर यांनी त्रिशरण पंचशिल देवून
भिमस्तुती घेतली.
याप्रसंगी खिरदान वाटप करण्यात आली व भव्य
मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
पी.एस. निकम , सचिन ब्राम्हणे
राजु त्रिभुवन , सतिश ब्राम्हणे ,
हितेश ब्राम्हणे यांनी परिश्रम
घेतले.

Previous articleसर्व पुरोगामी विचारधारेच्या राजकीय पक्षाने मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे-प्रा श्याम मानव
Next articleबनावट कागदपत्राच्या आधारे भूखंडाची विक्री. खरेदीवर उभी केली तोतीया महिला! गुन्हा दाखल.-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here