Home भंडारा पहेला ते अंभोरा सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची...

पहेला ते अंभोरा सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याबाबत

116

आशाताई बच्छाव

IMG_20240205_181251.jpg

पहेला ते अंभोरा सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याबाबत

पहेला या ठिकाणी अंभोरा कडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर देण्याबाबत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी भंडारा ,कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद अध्यक्ष ,पोलीस स्टेशन अड्याळ यांना निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा- जिल्हा प्रतिनिधी)- पहेला ते अंभोरा सुरू असलेल्या सिमेंट क्रांती व डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट बांधकाम याची त्वरित चौकशी करण्यात यावी व पहेला येथे आंबोरा कडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड
स्पीड ब्रेकर देण्यात यावे या मागणी करता आज दिनांक ५

फरवरी 2024 ला केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा बांधकाम मंत्री जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर साहेब भंडारा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद भंडारा , जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा पोलीस स्टेशन अड्याळ यांना या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते विनोद वंजारी, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे ,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे विलास बांडेबुचे यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,पहेला ते अंभोरा 7.60 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती करता 24.90 कोटी रुपये मंजूर करण्यात आले . व त्या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आले. रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली असून सिमेंट काँक्रीट मधोमध रस्त्याच्या बाजूला काम सुरू असून ज्या ठिकाणी 1)सिमेंट काँक्रीट रस्त्याचे एक फूट खोदकाम करण्यात आले असून त्यामध्ये दीड इंच बोर्डर व 40 एम एम गिट्टी चा वापर करण्यात येत नाही .2)मुरूम ऐवजी मातीचा वापर करण्यात येत आहे .3)त्याचप्रमाणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून रस्त्याचे कोणतेही खोदकाम न करता त्यावर गिट्टी व बारीक चुरीचा वापर करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे डाबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम होत आहे. त्यामुळे वरील प्रकरणाची चौकशी करून बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे . 4)भंडारा ते पवनी रोडवर असलेल्या पहेला या ठिकाणी अंभोरा रस्त्यावर स्पीड ब्रेकर देण्यात यावा कारण अंभोरा कडे जाणारा वळण मार्ग असल्यामुळे या ठिकाणी गर्दी वाढत असते .त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .अन्यथा येत्या दहा दिवसात आंदोलन करण्यात करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Previous article” किरन पाटनकर यांचे दुःखद निधन “
Next articleसिन्नर फाट्यावर पायी यात्रेकरू भाविकांना फळे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.