Home भंडारा पूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्या –भावेश कोटांगले

पूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्या –भावेश कोटांगले

198

आशाताई बच्छाव

IMG_20231218_183721.jpg

पूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्या –भावेश कोटांगले

जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा /गोंदिया च्या वतीने पूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहीले पाहिजे या करिता आज जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले दिपावली पासून आपल्या जिल्ह्यात मंडई /यात्रा असते व त्या निमित्ताने रात्रीला संगीत नाटक, ऑकेस्ट्रा,कव्वाली, तमाशा,गोंधळ ,लावणी,दंडार असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
परंतु नोव्हेंबर महिन्यात नाकाडोंगरी परिसरात लावणी प्रोग्राम च्या अश्लीलतेमुळे संपूर्ण राज्यात त्या कार्यक्रमाची चर्चा झाली. पण सादर करणारे कलावन्त हे आपल्या जिल्ह्यातील नसून इतर राज्यातील आहेत
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे रात्री १०वाजे नंतर बंद करण्यात येतात. काही गावात कार्यक्रमाचा स्टेज जिथे असतो तिथेच मंडई, यात्रा असते व तेथील दुकान हे रात्री ८ वाजेपर्यंत असतात अशात कशा पध्द्तीने रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रम सादर करावा हा प्रश्न गावातील मंडळांना आला त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा रद्द होत आहेत,
वर्षातून ४ महिने कार्यक्रम करून उर्वरीत महिने परिवाराचा पालन पोषण व उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतावर आज उपासमारीची वेड आलेली आहे म्हणून पूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू व्हावेत असे निवेदन प्रतिभावंत प्रबोधनकार संघटनेचे वतीने देण्यात आले.
निवेदन देतांना संघटनेचे केंद्रीय कोषाध्यक्ष मनोज कोटांगले ,जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, भंडारा संचालक हितेश पाटील, अक्षय मेश्राम, मोहाडी संचालक कलाकार खोब्रागडे, पवनी संचालक विजय महानंदे, विठ्ठल शेंडे, एकता कलाकार अशोशियन वेल्फेअर चे अध्यक्ष राजेश वासनिक, नितीन पराते , व सर्व स्तरीय कलावंत उपस्थित होते.

Previous articleधनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीसाठी चाळीसगावात रास्ता रोको …
Next articleगडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.