Home जळगाव धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीसाठी चाळीसगावात रास्ता रोको …

धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीसाठी चाळीसगावात रास्ता रोको …

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_100936.jpg

धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीसाठी चाळीसगावात रास्ता रोको …

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी चाळीसगाव मालेगाव रोड बायपास अहिल्यादेवी चौफुली येथे दि 17 रोजी रस्त्यावर मेंढया आणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या 75 वर्षापासून धनगर समाज आरक्षणासाठी भांडतो आहे परंतु आजही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही घटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण लागू केल आहे परंतु धनगड आणि धनगर र आणि ड मध्ये सरकारने धनगर समाजाला अडवून ठेवले आहे
धनगड राज्यात अस्तित्वात नसताना राज्यात धनगर समाज हा मोठ्या संख्येने आहे इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण लागू आहे परंतु महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला कायमच आरक्षणापासून वंचित ठेवले,
आजच्या आंदोलनाची ही फक्त ठिणगी आहे यापुढे तालुक्यात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज पेटून उठेल असा इशारा यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी गणेश जाने, मारुती काळे, साहेबराव आगोने, अशोक देवरे, सोनू पैलवान, कैलास आगोने, खंडू कोर, ज्ञानेश्वर बोराडे, संदिप देवरे, विशाल धनगर, संजय पवार, ज्ञानेश्वर साबळे, राजेंद्र साबळे, अनंत गोरे, आप्पा गोरे, दिलीप जाने, रविंद्र रावते, शांताराम आगोने, सागर देवरे, ज्ञानेश्वर वेळे, धर्मा बच्छे, शिवम आगोने, युवराज हाडपे, संभाजी रावते, जिभाऊ हाडपे, देवचद साबळे, संदिप गढरी, संजय जाने, खंडू जाने, पोपट देवरे, भावलाल आगोने, शैलेश सातपुते, देवा निकम आदीधनगर समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleशिंदवणे गावातील राज्य महामार्ग ११७ नकाशाप्रमाणे व्हावा या मागणीसाठी गेले ४ दिवस उपोषण सुरू
Next articleपूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्या –भावेश कोटांगले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here