Home नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा संपन्न रोजगार मेळाव्यात 1 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा संपन्न रोजगार मेळाव्यात 1 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20221015-WA0006.jpg

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा संपन्न

रोजगार मेळाव्यात 1 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 14 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 14 आस्थापनांमधील एकूण 2 हजार 340 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात आली. त्यामध्ये एकुण 1 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

या रोजगार मेळाव्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेश गणवीर, औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य सुभाष परघणे, सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के.अन्नपूर्णे, राष्ट्रीय सेवा योजन अधिकारी मोहन कलंबरकर, निरेक्षक संचालक सचिन शहा, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार निवृत्ती सामाळे, गटनिर्देशक, निर्देशक यांची उपस्थिती होती.

सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या

Previous articleकहाळा बू.येथे १२ लाख ७१ हजार ४९० रुपयाचा गुटखा जप्त.
Next articleचर्चेतला वाघ…म्हणे बंदुकीच्या धाकावर जवाब नोंदवले : संजय राऊत.! राज्यातील तपास यंत्रणा येउडी पण मोकाट नाही कोणालाही गनपॉइंट वर ठे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here