Home नांदेड कहाळा बू.येथे १२ लाख ७१ हजार ४९० रुपयाचा गुटखा जप्त.

कहाळा बू.येथे १२ लाख ७१ हजार ४९० रुपयाचा गुटखा जप्त.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20221015-WA0015.jpg

कहाळा बू.येथे १२ लाख ७१ हजार ४९० रुपयाचा गुटखा जप्त.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
==================
बिलोलीचे सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून नायगाव तालुक्यातील काहाळा (बु) येथील अवैध गुटखा साठवूना-या विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून बारा लाख एकाहत्तर हजारचा गुटखा जप्त करून एका आरोपीस अटक करण्यात आल्याची माहीती कुंटूरचे सपोनि महादेव पुरी यांनी दिली आहे.

चांडक यांना नायगाव तालुक्यातील कहाळा (बु) येथील नवीन आबादी येथील टिनशेड मध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आसल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने त्यांनी नायगाव, कुंटूर, पोलीस आणि रामतीर्थ पोलीस यांचे संयुक्त पथक करून १३ ऑक्टोबर च्या ८ वाजेच्या सुमारास खाजगी वाहनात जाऊन मुस्तफा शेख यांच्या घरावर धाड मारत १२ लाख ७१ हजार ४९० रूपायचा मुदेमाल जप्त केला आहे.

बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, सपोनि महादेव पुरी यानी संयुक्त पथक तयार करून काहाळा( बु ) ही सर्वांत मोठया गुटखा आडयावर धाड मारत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कारवाईने अवैध गुटखा विकणा-यां माफीयाचे धाबे दणाणले आहेत.
नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी मुस्तफा जमिल शेख यांच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात कलम 188 , 272,273, 328, भादवी सह अन्नसुरक्षा व मानदे कायदया अंतर्गत 26 (2 ) 27, 30( 2),(अ) कलम चा भंग करून शिक्षा पात्र 59 प्रमाणे कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महादेव पुरी हे करत आहेत. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नायगाव, रामतिर्थ आणि कुंटूर पोलीसानी परिश्रम घेतले आहे .

Previous article13 ते 19 वयोगटातील मुलींच्या पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Next articleऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा संपन्न रोजगार मेळाव्यात 1 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here