Home नांदेड 13 ते 19 वयोगटातील मुलींच्या पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज – जिल्हाधिकारी...

13 ते 19 वयोगटातील मुलींच्या पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20221013-WA0062.jpg

13 ते 19 वयोगटातील मुलींच्या पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज
– जिल्हाधिकारी अभिजित राऊत

▪️किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे निर्देश
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील किनवट, माहूर व आजुबाजुच्या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत. यात प्रामुख्याने वय वर्षे 13 ते 19 या वयोगटातील मुलींच्या आरोग्यावर, त्यांच्या पोषणावर अधिक लक्ष दिल्यास त्यांना सुदृढ व निरोगी होण्यास वेळ लागणार नाही. याच मुली भविष्यात आपल्या सुदृढ बाळाला जन्म देऊन कुपोषणाचे आव्हान परतून लावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या व आरोग्य विषयक योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प जरी असले तरी महिलांच्या आरोग्याचा विशेषत: मुलींच्या कुपोषणाचा सातत्याने लक्ष द्यावा लागणारा प्रश्न आहे. 13 ते 19 या वयोगटातील मुलींमध्ये असलेला अशक्तपणा हा नजरेआड करता येणार नाही. सद्यस्थितीत कुपोषीत माता व बालकांसाठी जिल्ह्यात एकच पोषण पुनर्वसन केंद्र आहे. आदिवासी भागासाठी याच धर्तीवर किनवट येथे नवीन पोषण पुनर्वसन केंद्र चालू करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. प्राथमिक स्तरावर या विषयाला प्राधान्याने किनवट, माहूर या दोन तालुक्यावर लक्ष केंद्रित करून टप्याटप्याने संपूर्ण जिल्हाभर त्याचा विस्तार करू असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी या बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गाभा समिती, लसीकरण, कोविड लसीकरण, क्लायमेट चेंज व इतर अनुषांगिक आरोग्याच्या योजनांबाबत माहिती सादर केली.

Previous articleस्व आ.गोविंदराव राठोड स्मृती वक्तृत्व स्पर्धेत सुल्लाळी आश्रम शाळेची सना शेख प्रथम.
Next articleकहाळा बू.येथे १२ लाख ७१ हजार ४९० रुपयाचा गुटखा जप्त.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here