Home नांदेड स्व आ.गोविंदराव राठोड स्मृती वक्तृत्व स्पर्धेत सुल्लाळी आश्रम शाळेची सना शेख प्रथम.

स्व आ.गोविंदराव राठोड स्मृती वक्तृत्व स्पर्धेत सुल्लाळी आश्रम शाळेची सना शेख प्रथम.

135

आशाताई बच्छाव

IMG-20221013-WA0047.jpg

स्व आ.गोविंदराव राठोड स्मृती वक्तृत्व स्पर्धेत सुल्लाळी आश्रम शाळेची सना शेख प्रथम.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड येथून जवळच असलेल्या वसंतनगर येथील सेवादास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वर्गीय आमदार गोविंदराव राठोड यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त संस्था अंतर्गत आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी स्वर्गीय आमदार गोविंदराव राठोड व्यक्ती आणि कार्य आणि आई हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत सुल्लाळी – डोंगरगाव तालुका जळकोट येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी सना शेख हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून या स्पर्धेसाठी सना शेख या विद्यार्थिनीला सहशिक्षक चंद्रशेखर गव्हाणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
विमुक्त जाती सेवा समिती या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष किशनराव राठोड, सचिव गंगाधरराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्य संतोषभाऊ राठोड, शाळेचे प्राचार्य नागनाथ कोयलकोंडे, व्यंकट रामदिनवार, संजय राठोड, सय्यद जलील आदींनी अभिनंदन केले आहे.
संस्थेच्या विश्वस्त श्रीमती चक्रवतीबाई गोविंदराव राठोड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव गोवर्धनजी पवार, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, प्राचार्य मेघाजी सर, प्राचार्य दिलीप गायकवाड मुख्याध्यापक गोविंदराव पवार, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार आदींची उपस्थिती होती.

Previous articleआंतरशालेय कब्बडी स्पर्धेत माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथील विद्यार्थ्यांनी अजिंक्य पदाचे मानकरी.
Next article13 ते 19 वयोगटातील मुलींच्या पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.